मुंबई-बिहारमध्ये येणे जाणे आता सुरूच राहणार; तेजस्वी यादवांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

राजकारण आणि निवडणूका या विषयांवर आमच्यात कोणत्याही कोणत्याही प्रकारचे बोलणे झाले नाही.

Aditya Thackeray

शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी भेट देत असतात. अशातच आदित्य ठाकरे हे आज बिहार दौऱ्यावर आहेत. यावेळी आदित्य ठाकरेंनी बिहार मध्ये तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांची भेट घेतली. या भेटींनंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात जेव्हा आमचे सरकार होते तेव्हा आणि त्या आधीही आमचे तेजस्वी यादव यांच्यासोबत बोलणे होत होते पण कोरोना काळ असल्यामुळे आमची भेट होऊ शकली नव्हती. पण आता आपण पाहिले तर बिहार मध्ये त्यांनी केलेले काम दिसत आहे. बिहारची प्रगती आणि विकास होताना दिसत आहे. आमच्यात नेहमी बोलणे तर होत होते पण भेट झाली नव्हती म्हणून मी तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांची भेट घेण्यासाठी बिहारमध्ये आलो आहे. असे शिवसेने नेते आदित्य ठाकरे म्हणाले.

याच संदर्भात आदित्य ठाकरे म्हणाले तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांना मी भेटलो तेव्हा माझी त्यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा झाली. पर्यावर, उद्योग – व्यवसाय या विषयांवर चर्चा झाली. त्याच सोबत सर्वात महत्वाचा मुद्दा असा की, देशातील तरुण जे देशासाठी आणि रोजगार मिळविण्यासाठी काम कारण्यासाठी इच्छुक आहे. महागाई विरुद्ध आणि संविधानासाठी काम करण्यास इच्छुक आहे अशा मुद्द्यांवर बोलून चर्चा केली पाहिजे. तरच देशातील तरुण पिढीसाठी आपल्याला काहीतरी महत्वपूर्ण कार्य करता येईल असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

राजकारण आणि निवडणूका या विषयांवर आमच्यात कोणत्याही कोणत्याही प्रकारचे बोलणे झाले नाही. कारण राजकारण आणि निवडणूका या विषयांवर राजकीय पक्षांमध्ये होतच असतात. त्यामुळे आम्ही यावर काही बोलली नाही. आज सर्वात महत्वाचे हे होते की, आमची भेट झाली. सुरुवातीपासुनच दोन्ही परीवारांचे आणि पक्षांचे संबंध चांगले आहेत. त्यात काहीच कटुता आली नाही. हीच मैत्री पुढे अशीच राहील. या भेटीला राजकीय वळण देऊ नये असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी तेजस्वी यादव यांना मुंबईत यावे असेही सांगितले आहे. यापुढे हे येणे-जाणे असेच चालू राहील असेही आदित्य ठाकरे म्हणाले. तेजस्वी यादव आणि मी ‘लंबी रेस के घोडे है’ असेही आदित्य ठाकरे म्हणाले.


हे ही वाचा – गुजरातच्या ‘या’ गावात निवडणुकीच्या प्रचारसभांना मनाई, मतदान न केल्यास होते दंडात्मक कारवाई