घरक्राइमअमेरिकेच्या व्हर्जिनियात अंदाधुंद गोळीबार; 10 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

अमेरिकेच्या व्हर्जिनियात अंदाधुंद गोळीबार; 10 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Subscribe

अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमेरिकेच्या व्हर्जिनियातील चेसापीक येथील वॉलमार्ट स्टोअर येथे गोळीबार झाला असून, यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. तसेच, या गोळीबारात अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमेरिकेच्या व्हर्जिनियातील चेसापीक येथील वॉलमार्ट स्टोअर येथे गोळीबार झाला असून, यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. तसेच, या गोळीबारात अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या गोळीबाराची माहिती मिळताच चेसापीक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तिथून पळ काढणाऱ्या हल्लेखोराला बॅटलफिल्ड ब्लाव्ड येथे पकडण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. त्यावेळी त्याच्यावर गोळीबारही करण्यात आला. (many people death in virginia shooting police claim shooter killed firing in walmart store)

चेसापीक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबारात जवळपास 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच, बरेच जण जखमी झाले आहेत. या गोळीबारानंतर पोलीस इमारतीची चौकशी करत असून, हल्लेखोराचा मृत झाल्याचा पोलिसांना विश्वास आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून, सुरक्षेच्या कारणात्सव पोलिसांनी लोकांना इमारतीपासून दूर राहण्यास सांगितले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री 10:12 वाजता गोळीबारा झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने वॉलमार्ट स्टोअरच्या बाहेर मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला. सद्यस्थितीत अजूनही पोलीस घटनास्थळी तैनात असल्याची माहिती मिळते. शिवाय, 40 हून अधिक आपत्कालीन वाहनांनाही इमारतीबाहेर सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

डेलीमेल डॉट कॉमवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, घटनास्थळी उपस्थित लोकांनी गोळीबार करणारा व्यक्ती स्टोअरचा व्यवस्थापक असल्याचे सांगितले. व्यवस्थापक ब्रेक रूममध्ये घुसला आणि दुकानातील इतर कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला.

- Advertisement -

अमेरिकेत सामूहिक शूटिंग

अमेरिकेतील सामूहिक गोळीबाराचा सिलसिला थांबण्याचे नाव घेत नाही आहे. अमेरिकेतील कोणत्या ना कोणत्या शहरातून दररोज सामूहिक गोळीबाराच्या बातम्या येत असतात. फक्त दोन दिवसांपूर्वी, कोलोरॅडो स्प्रिंग्समध्ये एका गे नाईट क्लबमध्ये एका बंदुकधारीने गोळीबार केला, ज्यात किमान पाच लोक ठार आणि 18 जखमी झाले.


हेही वाचा – कोणतेही गाव पाण्यावाचून इकडे-तिकडे जाण्याचा विचार करणार नाही; महाराष्ट्र-कर्नाटक वादावर मुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -