घरमहाराष्ट्रगडकिल्ले, धार्मिक स्थळांच्या परिसरातही स्वच्छता आवश्यक - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गडकिल्ले, धार्मिक स्थळांच्या परिसरातही स्वच्छता आवश्यक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Subscribe

केंद्र सरकारच्‍या 'स्‍वच्‍छता ही सेवा' या राष्ट्रीय उपक्रम अंतर्गत आज 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत मुंबईत महापालिकेच्या वतीने गिरगाव चौपाटीसह 178 ठिकाणी जनसहभागातून स्वच्छता श्रमदान करण्यात आले.

मुंबई : ‘स्वच्छता हीच सेवा’ हा उपक्रम केवळ फोटो काढण्यासाठीचा नाही. यातून आपण संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एक जनचळवळ उभी करत आहोत. त्यामुळे प्रत्येकाने हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेसाठी रस्त्यावर उतरायला हवे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशातील सार्वजनिक स्वच्छतेसाठी सुरु केलेला “एक तारीख, एक तास” हा उपक्रम म्हणजे आपल्यासाठी सुंदर महाराष्ट्र, सुंदर भारत बनविण्यासाठी आपण टाकलेले मोठे पाऊल आहे. तसेच, राज्यातील गडकिल्ले, धार्मिक स्थळे, मंदिरे यांच्या परिसरात देखील स्वच्छता असली पाहिजे. ही तीर्थक्षेत्रे सुंदर दिसली पाहिजेत, यासाठी देखील सर्वांनी सहभागी होऊन योगदान द्यावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.(Cleanliness is also necessary in the vicinity of forts and religious places Chief Minister Eknath Shinde)

केंद्र सरकारच्‍या ‘स्‍वच्‍छता ही सेवा’ या राष्ट्रीय उपक्रम अंतर्गत आज 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत मुंबईत महापालिकेच्या वतीने गिरगाव चौपाटीसह 178 ठिकाणी जनसहभागातून स्वच्छता श्रमदान करण्यात आले. त्याचा एक भाग म्हणून स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे आयोजित प्रमुख कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

- Advertisement -

यानिमित्ताने, मुंबईतील चौपट्या, गड किल्ले येथील परिसर स्वच्छ झाला. स्वराज्यभूमीवरील श्रमदानामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार मंगेश कुडाळकर, इस्रायलचे भारतातील वाणिज्यदूत कोब्बी शोशानी, नॉर्वेचे भारतातील वाणिज्यदूत अर्ने जॅन फ्लोलो, तसेच राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक, मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल चहल, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव के. एच. गोविंदराज, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, तटरक्षक दलाचे पश्चिम विभागाचे महासंचालक कैलाश नेगी, नौदलाचे व्हाइस एडमिरल दिनेश त्रिपाठी, माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, उपायुक्त (परिमंडळ 1) संगीता हसनाळे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव तसेच अभिनेते नील नितीन मुकेश, पद्मिनी कोल्हापुरे, सुबोध भावे यांची प्रमुख उपस्थिती होती.
केंद्र आणि राज्य सरकारचे विविध विभाग, राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), वेगवेगळ्या स्‍वयंसेवी संस्‍था – संघटना, खासगी- सहकारी बॅंका, अंगणवाडी कर्मचारी, विविध व्‍यापारी संघटना तसेच इतर महाविद्यालयीन विद्यार्थी, अनिरुद्ध अकादमी, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि इतर स्वयंसेवी संघटना व संस्थांचे स्वयंसेवक यांनीदेखील येथे सहभागी होऊन स्वच्छता श्रमदान केले.

हेही वाचा : मराठीचा मद्दा पुन्हा एकदा पेटला; मुलुंडनंतर आता कांदिवलीत जागा हडपण्याचा प्रयत्न

- Advertisement -

बाणगंगा येथे कामांची पाहणी

स्वराज्यभूमी येथील श्रमदानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाणगंगा तलाव परिसरात जावून तेथे केलेल्या विकास कामांची पाहणी केली. पालकमंत्री दीपक केसरकर, महापालिका आयुक्त इकबाल चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी आदी यावेळी उपस्थित होते.

शिवडी किल्ला येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे श्रमदान

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त व त्यासोबत स्वच्छता हीच सेवा उपक्रम यांचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात गड-किल्ले स्वच्छता अभियानाचे आयोजन केले आहे. त्याचा भाग म्हणून उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवडी किल्ला येथे श्रमदान करुन या अभियानाचा शुभारंभ केला. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर, कौशल्य, उद्योजकता, रोजगार व नाविन्यता विभागाचे मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा : बीडच्या पोराची एशियन क्रीडा स्पर्धेत सुवर्ण कामगिरी; भारताच्या शिरपेचात खोवला मानाचा तुरा

मंत्री, लोकप्रतिनिधी, सिने कलाकारांचा सहभाग

आजच्‍या स्‍वच्‍छता श्रमदान मोहिमेत केंद्रीय सूक्ष्‍म, लघू व मध्‍यम उद्योग मंत्री नारायण राणे, खासदार गोपाळ शेट्टी, गजानन कीर्तीकर, पूनम महाजन, मनोज कोटक, आमदार आशीष शेलार, अतुल भातखळकर, प्रसाद लाड, आमदार प्रवीण दरेकर, मंगेश कुडाळकर, पराग अळवणी, विद्या ठाकूर, भारती लव्‍हेकर, अबू आझमी, राजहंस सिंह,दिलीप लांडे, सुनील शिंदे, योगेश सागर,अमीत साटम, मिहीर कोटेचा, कालिदास कोळंबकर, पराग शहा आदी लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. तसेच यामध्ये, सलीम खान, अनुपम खेर, उदित नारायण, सुनील शेट्टी, तुषार कपूर, अरबाज खान, सुरेश ओबेरॉय, नील नितिन मुकेश, वंदना गुप्ते, पद्मिनी कोल्हापुरे, जुही चावला, हर्षदा खानविलकर, सुबोध भावे, श्रेयस तळपदे, सुनील बर्वे, संजय नार्वेकर, स्वप्नील जोशी,अभिजीत केळकर,अरुण नलावडे, जयवंत वाडकर, प्रदीप कबरे, मानसी नाईक आदी मराठी – हिंदी चित्रपट सृष्टीतील सिनेकलाकार, गायक, निर्माते, दिग्दर्शक आदी मान्यवर सहभागी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -