घरक्राइमराजधानी दिल्ली पुन्हा हादरली; लिव्ह इन पार्टनरवर चाकूने एवढे केले वार की...

राजधानी दिल्ली पुन्हा हादरली; लिव्ह इन पार्टनरवर चाकूने एवढे केले वार की…

Subscribe

ही घटना दिल्लीत घडल्याचे गुन्हे पोलिस आयुक्त रवींद्र यादव यांनी सांगितले. याप्रकरणी आरोपी रिंकू (27 वर्षे) याच्याविरुद्ध रुपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

नवी दिल्ली : एका महिलेला प्रेम करण्याची भयानक शिक्षा मिळाली. सात वर्षांपासून सोबत राहत असलेल्या लिव्ह इन पार्टनरने किरकोळ कारणावरून झालेल्या वादात त्याने महिलेवर चाकू हल्ला केला. चाकूने तिच्या शरीराचे तुकडे केले. महिलेची अवस्था अशी झाली की डॉक्टरांना सुमारे 850 टाके घालावे लागले. सध्या त्या महिलेची प्रकृती चिंताजनक असून, पोलिसांनी आरोपीलाही अटक केली आहे.(Capital Delhi shook again Live in partner stabbed so much that…)

ही घटना दिल्लीत घडल्याचे गुन्हे पोलिस आयुक्त रवींद्र यादव यांनी सांगितले. याप्रकरणी आरोपी रिंकू (27 वर्षे) याच्याविरुद्ध रुपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेच्या 5 महिन्यांनंतर गुजरातमधून त्याला पकडण्यात आले. आरोपी तिथे लपून एका कारखान्यात काम करत होता. पीडितेचा 2011 मध्ये विवाह झाला होता, मात्र मतभेदांमुळे ती पतीपासून विभक्त होऊन जवाहरनगरमध्ये राहू लागली.

- Advertisement -

हेही वाचा : मराठीचा मद्दा पुन्हा एकदा पेटला; मुलुंडनंतर आता कांदिवलीत जागा हडपण्याचा प्रयत्न

दुकानात मैत्री झाली

पोलिसांनी सांगितले की, पीडित महिला 7 वर्षांपूर्वी तिच्या भावासोबत फुटवेअरच्या दुकानात काम करणाऱ्या रिंकूला भेटली होती. या संवादाचे रुपांतर मैत्रीत झाले आणि त्यानंतर दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. दोघांना गुर मंडीत बांधलेले घर मिळाले. दोघांनाही लग्नाशिवाय एक मुलगा आहे, मात्र त्यांच्यात वाद झाला तिच्यावर हा हल्ला झाला.

- Advertisement -

हेही वाचा : कोकण रेल्वे मार्गाबाबत मोठी अपडेट; ‘या’ वेळेपर्यंत सुरू होऊ शकते वाहतूक

कोणाशी तरी संबंध असल्याचा संशय

पोलिसांनी सांगितले की, यावर्षी 15 एप्रिल रोजी सकाळी आरोपीने पीडितेच्या घरामध्ये जबरदस्तीने प्रवेश केला आणि तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. डीसीपी अमित गोयल यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली इन्स्पेक्टर पवन कुमार आणि राकेश कुमार यांनी उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील रहिवासी असलेल्या रिंकूला गुजरातमधून पकडले. चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, त्याने दुसऱ्याशी संबंध असल्याच्या संशयावरून त्याच्यावर चाकूने हल्ला केला.

2011 मध्ये पतीपासून झाली होती विभक्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आपल्या पतीपासून वेगळी राहत होती.तिचे 2011 मध्ये लग्न झाले होते. पण, पतीसोबत वाद निर्माण झाल्याने ती वेगळी राहत होती. महिलेचा भाऊ भरत याने यासंदर्भात माहिती दिली. महिला जवाहर नगरमध्ये राहत होती. यावेळी तिचे आरोपीशी प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपी एका शूमार्टवर काम करायचा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -