घरमहाराष्ट्रइंदिराबाईची किती होती वट, टोमणेसेनेसोबत आता... मुख्यमंत्र्यांची कवितेतून काँग्रेसवर टीका

इंदिराबाईची किती होती वट, टोमणेसेनेसोबत आता… मुख्यमंत्र्यांची कवितेतून काँग्रेसवर टीका

Subscribe

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. मागील पाच दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोपांचे राजकारण रंगले. दरम्यान अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी भाषणातून विरोधकांनी केलेल्या आरोपांना, टीकेला खोच प्रत्युत्तर दिले, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शैलीत विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसची अवस्था पासून दया येत असल्याचे म्हटले. तसेच राज्यातील काँग्रेसच्या स्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास कवितेच्या शैलीतून प्रखर टीका केली. मुख्यमंत्र्यांची कविता ऐकताच सभागृहात एकचं हशा पिकला.

मुख्यमंत्र्यांची काँग्रेसवर कवितेतून टीका

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा उल्लेख करत म्हटले की, काँग्रेसचे नाना पटोले इकडे नाहीत. बाळासाहेब (थोरात) आहेत. काय परिस्थिती झाली आहे काँग्रेसची? काँग्रेसची बिचाऱ्यांची आधीही अडचण होतीच. आधी बाळासाहेब माझ्याकडे बोलायचे की, हे सगळं काय चाललंय. मी त्यांना बोलायचो की, माझ्या हातात सगळं नाहीये ना. माझ्या हातात सगळं असतं तर मी केलं असतं, असही ते म्हणाले.

- Advertisement -

यावेळी एकनाथ शिंदे यांनी कवितेच्या माध्यामातून काँग्रेसला डिवचले आहे.

काँग्रेसची स्थिती पाहून येते दया…

‘महाविकास आघाडीची पुरती गेली रया…

- Advertisement -

दादा आणि अंबादास बसले…

काँग्रेसवाले हात चोळत बसले…

तेव्हा इंदिराबाईंची किती होती वट …

टोमणे सेनेसोबत आता नुसती झाली फरपट …..

मुख्यमंत्र्यांची ही मिश्किल कविता ऐकूण सभागृहात एकचं हशा पिकला. यावेळी विरोधी बाकांवरील आमदारांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या कवितेवर हसून दाद दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी “इकडे अजित पवार आणि वर अंबादास. विरोधी पक्षनेते ठरवताना तुम्हाला विचारलंच नाही यांनी… अस म्हणताच बाळासाहेब थोरात यांनी “ती आमची आघाडीतली बाब आहे”, असं म्हणत वेळ मारून नेली. यावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा “तुम्ही जाहीरपणे बाहेर बोलले आहात की आम्हाला विश्वासात घेतलं नाही” अशी आठवण बाळासाहेब थोरातांना करून दिली.

विरोधकांच्या आरोपांवर मुख्यमंत्री म्हणाले…

माझ्यावर रोज आरोप केले जातात. कुणी गद्दार म्हणतात, कुणी काय नी कुणी काय. तीन दिवस गद्दार आणि खोके चालले होते, पण विरोधी देखील पोराटोरांसोबत उभे राहिले. फिफ्टी-फिफ्टी बिस्किटासारखे. रोहितही मागे होता. वरचा मिटकरीही तिथे आला आणि कळ काढत होता. आमच्या घोषणेनंतर तिथे जायला हवे होते.असं मुख्यमंत्री म्हणाले.

आम्हाला रोज गद्दार म्हणता, पण आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली नाही. राष्ट्रवादी, काँग्रेसने वाईट वाटून घेण्याची गरज नाही. बाळासाहेब म्हणायचे की, राष्ट्रवादी, काँग्रेस आपले शत्रु आहे, त्यांना जवळ करु नका, त्यांना जवळ करायचे असल्यास मी दुकान बंद करेल. असंही मुख्यमंत्री म्हणाले.


बीडीडी चाळीतील पोलिसांना १५ लाखांत घर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -