‘लाल सिंग चढ्ढा’बाबत जितेंद्र आव्हाडांकडून आकड्यांचा घोळ, ट्वीट केले डिलीट

लाल सिंह चड्ढावर होत असलेल्या बहिष्काराप्रकरणी राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया ट्वीटर अकाऊंटवरून शेअर केली आहे. परंतु हे ट्वीट करत असताना भावनेच्या भरात मोठी चूक केली होती, तसेच ही चूक लक्षात येताच त्यांनी त्यांचे ट्वीट डिलीट देखील केले आहे.

बॉलिवूड अभिनेता आमीर खानचा सध्या चित्रपटावर होणाऱ्या बहिष्कारामुळे चांगलाच चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपटावर सोशल मीडियावर ट्रोलर्सकडून बहिष्काराची मागणी केली जात होती. दरम्यान, या सर्व प्रकरणामुळे प्रेक्षकांनीही चित्रपट पाहण्यासाठी फारसा उत्साह दाखवलेला नाही. त्यामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. या सर्व प्रकरणांवर अनेक बॉलिवूड कलाकार आपल्या प्रतिक्रिया मांडत होते. अशातच आता राजकीय पक्षातील नेते सुद्धा याबाबत व्यक्त होताना दिसत आहेत.

लाल सिंह चड्ढावर होत असलेल्या बहिष्काराप्रकरणी राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया ट्वीटर अकाऊंटवरून शेअर केली आहे. परंतु हे ट्वीट करत असताना भावनेच्या भरात मोठी चूक केली होती, तसेच ही चूक लक्षात येताच त्यांनी त्यांचे ट्वीट डिलीट देखील केले आहे.

काय लिहिलं होतं ट्वीटमध्ये?

“भक्तांनी डोक्यावर घेतलेल्या ‘काश्मीर फाईल्स’पेक्षा, त्यांनी बहिष्कार घातलेल्या ‘लालसिंग चढ्ढा’ने जास्त पैसा कमावला. 7.5 दशलक्ष डॉलर्स, म्हणजे साधारण 6000 कोटी रुपये! भक्तांच्या मताला फारशी किंमत राहिलेली नाही असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे.” शिवाय त्याखाली हॅशटॅग फेक बॉयकॉट असं देखील लिहिलं आहे.

परंतु 7.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजे 6000 कोटी रूपये नसून 60 कोटी रूपये असतात. ही गोष्ट जेव्हा राष्ट्रवादीचे आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांना समजली तेव्हा त्यांनी लगेच ते ट्वीट डिलीट केले. जितेंद्र आव्हाड यांच्या या ट्वीटवर अनेकांनी संताप व्यक्त केला तर काहींनी गमतीशीर कमेंट्स देखील केल्या होत्या.

हेही वाचा :खूप बोलावसं वाटतं, पण…बॉलिवूडच्या बहिष्कारावर अमिताभ बच्चन यांचा निशाणा?