घरताज्या घडामोडीआमचा फोटो असेल किंवा नसेल, पण... मुख्यमंत्री शिंदेंनी जाहिरातीवर दिली प्रतिक्रिया

आमचा फोटो असेल किंवा नसेल, पण… मुख्यमंत्री शिंदेंनी जाहिरातीवर दिली प्रतिक्रिया

Subscribe

शिवसेनेच्या शिंदे गटाकडून राज्यातील अनेक वर्तमान पत्रांमध्ये एक मोठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ‘राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ या मथळ्याखाली ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाला सुरूवात झाली आहे. या जाहिरातीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

आमचा फोटो असेल किंवा नसेल, पण…

राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यासाठी रवाना झाले. परंतु रवाना होत असतानाच त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. आमचं सरकार पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली काम करतंय. हे डबल इंजिनचं सरकार आहे. केंद्र सरकारकडून देखील महाराष्ट्रातल्या विकास प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर निधी दिला जातो. आर्थिक पाठबळ दिलं जातं. त्यामुळे मविआ सरकारच्या काळात मेट्रो आणि पायाभूत सुविधांचे प्रकल्प सगळे बंद होते. परंतु ते आम्ही तत्काळ सुरू केले. आम्ही प्रत्यक्ष रस्तावर उतरून काम करतो. घरात बसून काम करत नाही. मुंबई विकासाभिमुख होत आहे. सर्वसामान्य माणसाला हवा असलेला विकास हा माणसांना दिसू लागलाय. त्यामुळे या राज्यातील जनतेने या सर्व्हेच्या माध्यमातून मला आणि देवेंद्र फडणवीस यांना याकामाच्या माध्यमातून पसंती दिली आहे. त्यामुळे आमची जबाबदारी आणखीन वाढली आहे. लोकांनी आम्हाला पसंती दिली आहे. आमचा फोटो असेल किंवा नसेल. पण आम्ही दोघंही लोकांच्या मनात आहोत. हे सर्वात महत्त्वाचं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत

शेतकऱ्यांना आपल्या सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टी गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीत एनडीआरएफच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय आपण यापूर्वी केला होता. त्याचसोबतच दोन हेक्टरची मर्यादा वाढवून तीन हेक्टरपर्यंत करण्याचा निर्णय आपण घेतला होता. मविआ सरकारने ५० हजारापर्यंतची रेग्यूलर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्याची अंमलबजावणी केली नव्हती. त्यासंदर्भात अंमलबजावणी करण्याचा काम शिवसेना-भाजपा महायुती सरकारने केलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

शेतकऱ्यांना तत्काळ १५०० कोटींची मान्यता

शेतकऱ्यांच्या खात्यात ५० हजारांपर्यंतची मदत देणार असा निर्णय घेतला. त्याप्रमाणे आपण मदतही केली. आतापर्यंतच्या इतिहासात सततच्या पावसामुळे होणारं नुकसान देय नव्हतं. आपल्या सरकारने सततच्या पावसामुळे होणारं नुकसान नैसर्गिक आपत्ती धरावं. तसेच त्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशा प्रकारचा ऐतिहासिक निर्णय घेतला. सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ १५०० कोटींची मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे, असंही शिंदे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : जनतेने फडणवीसांना २ वेळा पसंती दिली, पण…, जाहिरातीवर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -