घरक्राइममीरा रोड हत्याकांड प्रकरणात आणखी एक खुलासा, कीटकनाशक पाजून केली सरस्वतीची हत्या?

मीरा रोड हत्याकांड प्रकरणात आणखी एक खुलासा, कीटकनाशक पाजून केली सरस्वतीची हत्या?

Subscribe

मनोज साने या आरोपीने सरस्वतीला विष देऊन, तिची हत्या केली आहे का? याबाबत आता पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. साने आणि सरस्वती यांच्या मोबाईलची आणि सीडीआरची पोलीस आता कसून तपासणी करत आहेत.

मीरा रोडमधील नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या गीता आकाश दिप बिल्डिंग, गीता नगर फेस -7, जे विंग सदनिका क्रमांक 704 मध्ये सरस्वती वैद्य नामक महिलेचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. मागील आठवड्यात 7 जून रोजी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी मनोज सानक नामक आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाता पोलिसांकडून तपास करण्यात येत असून या या घटनेविषयी नेहमीच वेगवेगळी माहिती समोर येताना दिसत आहे.

हेही वाचा – Fire News : खंडाळा घाटात ऑइल टँकरला आग, घटनेत चौघांचा दुर्दैवी मृत्यू

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज साने हा सरस्वती वैद्यच्या हत्येपूर्वी बोरिवलीतील नर्सरीच्या दुकानात गेला होता. या ठिकाणाहून त्याने कीटकनाशकाची खरेदी केली होती. त्यानुसार, सोमवारी (ता. 12 जून) दुपारी पोलीस आरोपी सानेला बोरीवलीच्या बाभई येथील एका नर्सरीच्या दुकानात घेऊन गेले होते. तेथे केलेल्या चौकशीत साने यानेच कीटकनाशकाची खरेदी केल्याचे उघड झाले आहे.

त्यामुळे मनोज साने या आरोपीने सरस्वतीला विष देऊन, तिची हत्या केली आहे का? याबाबत आता पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. साने आणि सरस्वती यांच्या मोबाईलची आणि सीडीआरची पोलीस आता कसून तपासणी करत आहेत. या गुन्ह्याचे गांभीर्य पाहून पोलिसांनी मीरा-भाईंदर महापालिकेकडे सरकारी पंच मागितलं आहे. त्यासंबंधीचं पत्र नया नगर पोलिसांनी पालिकेच्या आयुक्तांना दिलं होते. पालिकेने ही पालिकेचा कर्मचारी सरकारी पंच म्हणून पोलिसांना दिला आहे. त्यामुळे या हत्याकांडा प्रकरणी रोज नव्याने समोर येणारी माहिती अत्यंत धक्कादायक आणि खळबळ माजवणारी आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

मीरा-भाईंदर रोडच्या गीता नगर फेस -7 मधील गीता आकाश दिप बिल्डिंगच्या जे विंग सदनिका क्रमांक 704 मध्ये मागील तीन वर्षांपासून एक जोडपे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यात मनोज साने (56) आणि मृत सरस्वती वैद्य (32) हे राहत होते. या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून या ना त्या कारणांमुळे सतत भांडणं होत होती. त्यामुळे आरोपी मनोज साने याने करवतीच्या (आरी) साहाय्याने सरस्वतीचे तुकडे करून काही तुकडे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तर काही तुकडे कुकरमध्ये शिजवून रस्त्यावरील कुत्र्यांना खायला घातले.

शरीराचा अर्धा भाग हा घरातच असल्यामुळे दुर्गंधी येऊ लागली. तसेच मनोजच्या संशयास्पद हालचालीवरुन त्याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी घटनास्थळी धाव घेत घराचा दरवाजा उघडला असता हा धक्कादायक प्रकार त्यांच्या समोर आला. त्यानंतर पोलिसांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या मनोजला ताब्यात घेतले. सहानी यांचा अधिक तपास केला जात आहे. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नयानगर पोलीस ठाण्यात सुरू असल्याची माहिती मीरा-भाईंदर परिमंडळ -1 चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

तसेच या घटनेबाबत नेहमीच वेगवेगळी माहिती समोर येत आहे. आरोपी मनोज साने याला मृतक सरस्वती वैद्य ही मामा म्हणायची. या दोघांचे लग्न झालेले असले तरी वयात असलेल्या अंतरामुळे या दोघांनी आपले लग्न लपवल्याचे आता उघड झाले आहे. परंतु ज्या क्रूर पद्धतीने मनोज साने याने सरस्वतीची हत्या केली, ते माणुसकीला काळीमा फासणारे असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -