घरमहाराष्ट्रMilind Deora यांच्या पक्षप्रवेशानंतर CM Eknath Shinde यांचे मुंबईकडे लक्ष; 'खड्डेमुक्त' रस्ते करण्याचा संकल्प

Milind Deora यांच्या पक्षप्रवेशानंतर CM Eknath Shinde यांचे मुंबईकडे लक्ष; ‘खड्डेमुक्त’ रस्ते करण्याचा संकल्प

Subscribe

लोक रस्ते स्वच्छ करणाऱ्यांना, लोकांची कामे करणाऱ्यांना आणि लोकांना भेटणाऱ्यांना कसे काय साफ करतील? ते तर घरी बसणाऱ्यांना साफ करतील, अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

मुंबई : माजी केंद्रीय मंत्री आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी आज शिंदे गट (शिवसेना) प्रवेश केला आहे. यावेळी मिलिंद देवरा यांच्यासह मुंबईचे माजी 10 नगरसेवकांनी देखील शिदे गटात प्रवेश केला आहे. मिलिंदे देवराच्या पक्षप्रवेशानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. मी सुद्धा मिलिंद देवरासारखा निर्णय दीड वर्षापूर्वी घेतला होता. डॉक्टर नसतानाही मी दीड वर्षापूर्वी ऑपरेशन केले, अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. अजून काही प्रमुख लोक शिवसेना ( शिंदे गट) प्रवेश होणार आहे म्हणजे हा ट्रेलर आहे. पिच्चर अभी बाकी हैं”, असेही संकेत मुख्यमंत्र्यांनी मिलिंद देवराच्या प्रवेशानंतर दिले. यावेळी मुंबईचे रस्ते हे खड्डेमुक्त करण्याचा संकल्प घेतल्याचे सांगितले. यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता मुंबई महानगरपालिकेड देखील लक्ष केंद्र केल्याचे स्पष्ट दिसून आले. यावेळ मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर देखील टीका केली.

मिलिंद देवराच्या पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्री म्हणाले, “दीड वर्षापूर्वी माझी देखील मिलिंद देवरासारखी अवस्था होती. पण धाडसी निर्णय घेतला. त्यावेळी मी सर्वप्रथम श्रीकांतच्या आईला विश्वासात घेऊन माझा निर्णय सांगितला होता. काही ऑपरेशन असे करायचे की सुई देखील टोचली नाही पाहिजे आणि कुठे टाकाही लावला नाही. देशातील 50-56 वर्ष काँग्रेस पक्षाशी तुमच्या कुटुंबाची नाळ जोडली होती. मुरली देवरा यांनी महाराष्ट्र आणि देशासाठी मोठे योगदान आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – आजच्या आणि पूर्वीच्या काँग्रेसमध्ये खूप फरक; Milind Deora यांचा हल्लोबाल

मुंबई खड्डेमुक्त करण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प

मुंबईसंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले, “आता मुंबईच्या विकासाची गरज आहे. मुंबई हे अंतरराष्ट्रीय शहर आहे. देशाची आर्थिक राजधानी असून आपल्याला मुंबईसाठी अजून आणखी मेहनत करयाची आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त इकबाल सिंह चहल बोलविले होते. त्यावेळी आयुक्तांना विचारले की, मुंबईच्या रस्त्यात ऐवढे खड्डे का आहेत? तुमच्याकडे रस्त्यावरचे खड्डे मुजवण्यासाठी पैसे नाहीत का? असा सवाल केला होता. त्यावेळी आयुक्तांनी सांगितले की, दरवर्षी आपण रस्त्यावर डांबर डाकून ते दुरुस्त करतो. त्यासाठी जवळपास 450 हजार कोटी रुपये खर्च होतात. जर रस्ते काँक्रीटचे केले असते तर, पैसे वाचले असते. त्यामुळे आता दोन टप्प्यात मुंबईचे रस्ते सिमेंटचे करायचे. पुढच्या दोन वर्षात मुंबई ही खड्डेमुक्त करण्याचा संकल्प आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – शिवसेनेत प्रवेश करताच Milind Deora यांच्याकडून CM शिंदेंचं कौतुक; म्हणाले- सहज उपलब्ध होणारा नेता…

काम करणाऱ्यांना लोक कसे साफ करतील

श्रीकांत शिंदेच्या कल्याण मतदारसंघात काही लोक गेले होते. आता मुंबईत रस्ते सफाई सुरू आहे. आगामी निवडणुकीत सर्वांना साफ करा, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली होती. या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर देत म्हणाले, “लोक रस्ते स्वच्छ करणाऱ्यांना, लोकांची कामे करणाऱ्यांना आणि लोकांना भेटणाऱ्यांना कसे काय साफ करतील? ते तर घरी बसणाऱ्यांना साफ करतात. फिल्डवर फिरणाऱ्याला कसे काय साफ करतील. आमच्यावर टीका करणाऱ्यांनी एवढे लक्षात ठेवावे की तुम्ही जेवढे आमच्यावर बोलाल तेवढे जास्त खड्यात जाल, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -