घरमुंबईसिल्क साडीची काळी झालेली बॉर्डर कशी साफ कराल?

सिल्क साडीची काळी झालेली बॉर्डर कशी साफ कराल?

Subscribe

सिल्कच्या साड्या या दिसायला सुंदर असतात. पण, जर त्यांची बॉर्डर काळी झाली असेल तर त्या पुन्हा वापरल्या जात नाही. त्यामुळे दुकानदार सिल्कची साडी खराब होऊ नये यासाठी त्या व्यवस्थित पॅक करण्याचा सल्ला देतात.
खराब झालेली स्लिक साडी नीट करण्यासाठी अनेक जणी तर ड्राय क्लिनींगचा ऑप्शन निवडतात. पण, तुम्ही काही टिप्स फॉलो केल्यात तर घरच्या घरी स्लिक साडीची काळी झालेली बॉर्डर तुम्हाला साफ करता येईल. जाणून घेऊयात यासंबंधीचे हॅक्स ,

Yellow Sambalpuri doll design silk saree

- Advertisement -

संत्र्याची साल –
हिवाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे मार्केटमध्ये संत्री येऊ लागलेत. याच संत्र्याच्या साली तुम्हाला खाऊन झाल्यानंतर टाकून न देता वापरायच्या आहेत. यासाठी प्रथम संत्र्याची साल घेऊन ती स्वच्छ करून घ्यायची आहे. आता ती स्लिक साडीच्या काळी झालेल्या बॉर्डरवर घासायची आहे. काही वेळ साल चोळल्यानंतर बॉर्डर तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. आता तुम्ही पाहू शकता, काळी झालेली बॉर्डर ही स्वच्छ झाली असेल. आता तुम्हाला साडी ड्राय क्लिनींगला द्यायची गरज भासणार नाही.

लिंबू –
लिंबूमध्ये सायट्रिक अ‍ॅसिड असते. स्लिक साडीची काळी झालेली बॉर्डर साफ करण्यासाठी लिंबू फार उपयुक्त ठरते. यासाठी तुम्हाला एका भांड्यात लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे. आता लिंबाच्या सालीने हाच रस बॉर्डरवर चोळायचा आहे. काही वेळ साडी तशी राहू द्या. यानंतर साडी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. तुम्हाला काळी झालेली साडीची बॉर्डर हे पुन्हा स्वच्छ झालेली दिसेल.

- Advertisement -

बॉर्डर साफ करताना या गोष्टी लक्षात ठेवा –

  1. साडीची बॉर्डर साफ करताना कधीही टूथपेस्ट वापरू नका. अन्यथा ती पुन्हा काळी होण्याची शक्यता जास्त असते.
  2.  साडीला कागद किंवा फॉईलमध्ये घट्ट बांधून ठेवा जेणेकरून साडीची बॉर्डर खराब होणार नाही.
  3. स्लिक साडी घरी स्वच्छ करणे टाळा. ड्राय क्लिनींगचा वापर करा.
  4. इस्त्री करताना विशेष काळजी घ्या. कारण हीट ने साडीची बॉर्डर लवकर खराब होऊ शकते.

 

 


हेही वाचा ; वूलन कुर्ती कशी धुवाल?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -