घरमहाराष्ट्रमी कायम भाजपची पालखी वाहणार नाही - उद्धव ठाकरे

मी कायम भाजपची पालखी वाहणार नाही – उद्धव ठाकरे

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रश्नाचे चोख उत्तर दिले.

आज हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. सलग तीन दिवस विरोधकांकडून सरकारवर आक्रमकपणे टिका करण्यात आली होती. आज याच टिकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिली आहेत. ‘काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार बनवू असा शब्द उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंना दिला होता का?’ असा प्रश्न विधानसभेत बुधवारी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता. यालाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ‘दिलेल्या शब्दाचं कौतुक तुम्हाला कधी पासून झालं?’ असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. ‘मी वडिलांना दिलेला शब्द पाळण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो किंवा कोणत्याही टोका जाऊ शकतो आणि ते मी करून दाखवलं. तसंच मी कायमची भारतीय जनता पार्टीची पालखी वाहणार नाही, असा देखील शब्द मी बाळासाहेबांना दिला होता.’ याचीही मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना आठवण करून दिली.

तसंच मुख्यमंत्री असं म्हणाले की, काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार असा शब्द मी दिला नव्हता. आम्ही दिलेला शब्द पाळतो आणि पाळणार. पण दिलेल्या शब्दाचं कौतुक तुम्हाला कधी पासून झालं? आम्ही जो शब्द ठरवून आपण एकमेकांना दिला होता. तो शब्द आपणं पाळला नाहीत. पण मी मात्र माझ्या वडिलांना दिलेला शब्द पाळणार कोणताही थराला जाऊन आणि कोणत्याही टोकाला जाऊन आणि ते मी केलं.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस यांनी विद्यमान सरकाराला तीन चाकी रिक्षाचे सरकार म्हटलं होते. ज्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले की, निश्चितच त्यांचे सरकार हे सर्व गोर गरीबांचे सरकार आहे. या सामान्यांना गोर गरीबांना तीन चाकी रिक्षाच परवडते त्यांना बुलेट ट्रेन ही परवडणार नाही असे देखील ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांनी केलेल्या टीकांवर उत्तर दिले.


हेही वाचा – ‘सामना’त पंतप्रधानांचे कौतुक नाही का दिसले?

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -