घरताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांची तब्येत उत्तम, आता स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? - अजित पवार

मुख्यमंत्र्यांची तब्येत उत्तम, आता स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? – अजित पवार

Subscribe

मुख्यमंत्र्यांची तब्येत उत्तम आहे. मुख्यमंत्री आज वर्षावर आले होते. विधिमंडळासह वरच्या आणि खालच्याही सभागृहात आले होते. आता आम्ही सर्व मंत्री उपस्थित राहण्याच्या सूचना त्यांनी केल्यात. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची बैठक ही ९ वाजता विधिमंडळात घेण्यास सांगितली.

मुंबईः सरकारनं आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री अनुपस्थित राहिल्यानं चर्चांना उधाण आलंय. तसेच मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीबाबतही अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. त्यालाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलंय. अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतलीय, त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांची तब्येत उत्तम आहे. मुख्यमंत्री आज वर्षावर आले होते. विधिमंडळासह वरच्या आणि खालच्याही सभागृहात आले होते. आता आम्ही सर्व मंत्री उपस्थित राहण्याच्या सूचना त्यांनी केल्यात. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची बैठक ही ९ वाजता विधिमंडळात घेण्यास सांगितली.

- Advertisement -

या बैठकीत मी, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, जयंत पाटील असे सर्व मिळून आम्ही बैठक घेणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी सर्व कॅबिनेटला सांगितलं की, मी त्या ठिकाणी माझ्या सोयीनुसार केव्हाही उपस्थित राहीन, मी केव्हाही तिथे येईन आणि तुम्ही निश्चितपणे सर्वांनी कामं करा आणि जबाबदारी पार पाडावी. असं अजित पवार म्हणाले. तसेच पूर्ण अधिवेशनात ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर अजित पवारांना पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा छेडले असता मुख्यमंत्र्यांची तब्येत उत्तम, आता स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का?, असं अजित पवार म्हणालेत.

मुख्यमंत्र्यांना मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास

उद्धव ठाकरे यांना मागील काही दिवसांपासून मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास होत आहे. त्यासाठी त्यांनी गेल्या सोमवारी गिरगावातील सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी केली होती. तसेच यावेळी त्यांनी काही शारीरिक चाचण्या केल्या होत्या. मानेच्या दुखण्यामुळे (Cervical Spine Surgery) 12 नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हापासून गेले 22 दिवस ते रुग्णालयात होते.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -