घरताज्या घडामोडीSkin Care Tips : सुरकुत्यांपासून वाचण्यासाठी आणि तजेलदार चेहऱ्यासाठी जाणून घ्या 'Grape...

Skin Care Tips : सुरकुत्यांपासून वाचण्यासाठी आणि तजेलदार चेहऱ्यासाठी जाणून घ्या ‘Grape Seeds Oil’चे फायदे

Subscribe

हल्ली वातावरणातील प्रदूषणामुळे चेहरा निस्तेज होतो.त्यावर उपाय म्हणून अनेकजण बाजारातील सोदर्यं प्रसाधानांवर विश्वास ठेवत ती विकत घेतात. मात्र, त्याचे हवे तसे परिणाम आपल्याला पाहायला मिळत नाही.प्रत्येकालाच आपली त्वचा नितळ आणि तजेलदार असावी असे वाटत असते. त्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करत असतात. त्वचेला कोमल आणि नितळ करण्यासाठी ग्रेप सीड ऑइल खूप महत्त्वाचे ठरते.ज्याप्रमाणे हिवाळ्यात लोशन काम करते, त्याचप्रमाणे ग्रेप सीड ऑइल काम करते. या ऑइलमुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल.या ऑइलचा उपयोग कॅलिफॉर्नियामध्ये जास्त प्रमाणात केला जातो.त्यामुळे त्यांची त्वचा तजेलदार दिसते. आयुर्वेदात द्राक्षाच्या बियांच्या तेलाचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत.जाणून घ्या कशाप्रकारे हे तेल आपल्या त्वचेसाठी गुणकारी ठरते.

त्वचेच्या रोगापासून दूर राहण्यास उपयुक्त

- Advertisement -

आयुर्वेदात ‘ग्रेप सीड ऑइल चिकित्सा’ पद्धतीचा महत्त्वाचा हिस्सा आहे. त्वचेचे रोग जसे की,सोरायसिस,एक्जिमा,एलर्जी याशिवाय गंभीर स्वरुपातील त्वचेच्या रोगासाठी हे तेल फायदेशीर ठरते.

सुरकुत्या दूर करते

- Advertisement -

 

द्राक्षाच्या बियांच्या तेलामध्ये एंटी ऑक्सीडंट असते.याशिवाय त्यामध्ये व्हिटॅमिन ई आणि ओमेगा ६ हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे हे तेल सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक किरणांपासून आणि प्रदूषणापासून चेहऱ्याला वाचवते.हे तेल त्वचेला आतून हायड्रेट करते.

पेशींसाठी उपयुक्त

 

द्राक्षांच्या बियांचे तेल त्वचेवर लावल्याने पेशी सुधारतात.त्याच्या वापरामुळे चेहऱ्यावरील डाग निघून जातात.याशिवाय हे तेल चेहऱ्यावरील डेड सेल्स हटवण्यासाठी मदत करते.ज्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते.

उत्तम स्किन टोनर आणि मेकअप रिमूवर

तुम्ही या तेलाचा उपयोग स्किन टोनर किंवा मेकअप रिमूवरसाठी करु शकता.मात्र असे वापरण्या अगोदर त्यात गुलाबजल मिसळणे महत्त्वाचे आहे.ग्रेप सीड ऑइलमुळे डार्क सर्कल नाहीसे होण्यास मदत होते.

हे तेल वापरण्याची योग्य पद्धत काय?

द्राक्षांच्या बियांचे तेल हे शुद्ध रुपात डायरेक्ट वापरु नये कारण ते बरेच स्ट्रॉंग असते.त्यामुळे हे तेल वापरताना कोणतेही हर्बल तेल त्यात मिक्स करुन त्यानंतरच या तेलाचा वापर करावा.


हे ही वाचा – पुस्तकापेक्षा सिनेमा उत्तम ! 3 Idiots वरुन आर माधवन आणि चेतन भगत यांच्यात ट्विटर वॉर


 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -