घरताज्या घडामोडीआता मंत्रालयात येण्याची गरज नाही; प्रत्येक विभागात होणार मुख्यमंत्री कार्यालय

आता मंत्रालयात येण्याची गरज नाही; प्रत्येक विभागात होणार मुख्यमंत्री कार्यालय

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष सुरु करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ठाकरे यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. आता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जनतेला प्रत्येक लहान-सहान कामासाठी मंत्रालयात येण्याची गरज भासणार नाही. कारण ठाकरे यांनी राज्याच्या प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय उभारण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. विरोधी पक्षाने विदर्भासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ठाकरेंनी ही घोषणा केली.

मुंबईपासून दूर राहणाऱ्या लोकांना आपल्या समस्या थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवता याव्यात, यासाठी मुख्यमंत्री कार्यालय प्रत्येक विभागात काम करेल. मुंबई आल्यानंतर मंत्रालयात नेमके कोणाला भेटायचे? मुख्यमंत्र्यांकडे समस्या कशा मांडायच्या? याबाबत ग्रामीण भागातील लोक गोंधळून जातात. लोकांना आपल्या समस्या सोडविण्यासाठी हेलपाटे मारावे लागू नये, यासाठी राज्याच्या प्रत्येक विभागात सीएमओ कार्यालय थाटण्यात येणार आहे.

- Advertisement -

हे वाचा – ठाकरे सरकारचा कामाचा धडाका; आता प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष

उद्धव ठाकरेंनी केलेल्या इतर घोषणा

  • दहा रुपयांत भोजन देणारी ‘शिव भोजन योजना’
  • सिंचन प्रकल्पांना गती देणार
  • समृद्धी महामार्गाला गती
  • धान उत्पादकांना आणखी 200 रुपये अनुदान
  • अन्नप्रक्रिया क्लस्टर उभारणार
  • रस्ते निर्मितीसाठी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग
  • ‘आशां’चे मानधन वाढविणार
  • विदर्भाच्या विकासाला चालना

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -