घरताज्या घडामोडीठाकरे सरकारचा कामाचा धडाका; आता प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष

ठाकरे सरकारचा कामाचा धडाका; आता प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष

Subscribe

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्या नंतर वेगवेगळे निर्णय घेण्याचा धडाका लावला असून, लवकरच आता प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे लवकरच याचा शासन निर्णय होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एक पाऊल पुढे  असल्याची चर्चा सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आरोग्य विभागात काम करण्याचा निर्णय घेतला आणि मुख्यमंत्री विभागाकडून मंत्रालयात मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाची स्थापना त्यांनी केली. या स्थापनेतून लाखो लोकांना आरोग्याची सेवा देखील मिळाली तसेच अनेकांचे जीव वाचले.

आता मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आल्यानंतर त्यांनी देखील हीच आरोग्याची सुविधा प्रत्येक जिल्ह्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एव्हढच प्रत्येक जिल्ह्यात शासनाचा मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष सुरू करण्याच्या सूचनेला उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदील दिला असून, यासंदर्भातला शासन निर्णय लवकरच निघणार आहे. शिवसेनेच्या कामामध्ये नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्याचे कार्यक्रम असतात तसेच शिवसेनेकडून अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे देखील घेतली जातात. शाखा शाखांमधून रक्तदान आणि आरोग्याच्या शिबिरांची जनजागृती केली जाते. इतकेच नाही तर शिवसेनेकडून महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी त्यावेळी डॉक्टर दीपक सावंत यांचा पुढाकार होता आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी आपल्या कामाचा धडाका सुरू केला असून, त्यांच्याकडे शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी प्रस्ताव दिला आहे.

- Advertisement -

तसेच प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय कक्ष सुरू करावा अशी विनंती त्यांनी केली आहे. या विनंतीला क्षणाचाही विलंब न करता उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली असून लवकरच या संदर्भातला जीआर निघणार आहे.

एक प्रतिक्रिया

  1. मा. मुख्यमंत्री साहेब तुमचे आभिनंदन आपले प्रत्येक जिल्हा रुग्णालयात जर चांगले केले व यथेच्च जर चांगली आँपरेशन ची सुविधा उपलब्ध करण्यात यावी. मुख्यमंत्री सहाय्यता नीधी गरीबांना होत नही आहे ज्याची परीस्थिती चागली आहे त्यानाच होत आहे असे ९०% गरीब लोकांना फायदा होतच नाही जेव्हा माहिती होते तेव्हा आपरेशन होऊन जाते.

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -