घरताज्या घडामोडीCNG-PNG Price : सीएनजी आणि पीएनजी दरात पुन्हा वाढ, सर्वसामान्यांच्या खिश्याला कात्री

CNG-PNG Price : सीएनजी आणि पीएनजी दरात पुन्हा वाढ, सर्वसामान्यांच्या खिश्याला कात्री

Subscribe

देशात इंधन दरवाढीमुळे हैराण असलेल्या सर्वसामान्यांना आता पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा सामना करावा लागत आहे. आज (रविवार) मध्यरात्रीपासून सीएनजी आणि पीएनजी दरात प्रतिकिलो अडीच रूपयांनी वाढ झाली आहे. सीएजी-पीएजी दराबाबत माहिती महानगर गॅस लिमिटेड कंपनीने दिली आहे. तर घरगुती गॅस असलेल्या पीएनजीमध्ये दीड रूपयांची वाढ करण्यात आलेली आहे.

सीएनजी आणि पीएनजी १८ रूपयांनी महागला

गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये पेट्रोलची किंमत शंभरीपार आहेत. तर राष्ट्रीय स्तरावर मागील दोन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. ४ डिसेंबरपासून भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाहीये. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सीएनजी आणि पीएनजी जवळपास १८ रूपयांनी महागला आहे.

- Advertisement -

वाहनांना दरवाढीचा चांगलाच फटका

या दरवाढीमुळे रिक्षा, बस आणि टॅक्सी यांसारख्या वाहनांना दरवाढीचा चांगलाच फटका बसणार आहे. सीएनजीचे दर ६६ रूपये प्रतिकिलो आणि पीएनजीचे दर ४० रूपये प्रतिकिलो इतके होणार आहेत. नोव्हेंबरमध्ये सीएनजी ३.९६ रूपये प्रतिकिलो तर पीएनजी २.५७ रुपयांनी महागला होता. तसेच ऑक्टोबरमध्येही दरवाढ झाली होती.

दरम्यान, देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत ९५.४१ रूपये प्रतिलिटर इतकं आहे. तर डिझेलची किंमत ८६.६७ रूपये प्रतिलिटर इतकं आहे. मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत १०९.९८ प्रतिलिटर तर डिझेलची किंमत ९४.१४ प्रतिलिटर इतकी आहे. मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती इतर महानगरांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : PSL 2022 : पाकिस्तान क्रिकेटच्या अडचणीत वाढ, दक्षिण आफ्रिका बोर्डाने दिला मोठा झटका


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -