घरताज्या घडामोडीराजकीय नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत, राज्यभरातील ७ कारखान्यांना आयुक्तांचा दणका

राजकीय नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत, राज्यभरातील ७ कारखान्यांना आयुक्तांचा दणका

Subscribe

राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांचे सहकारी साखर कारखाने त्यांच्या विधानसभा क्षेत्रात आहेत. यंदा उसाचा गाळप अधिक झाला असून पश्चिम महाराष्ट्रात यंदाच्या वर्षी सहकारी साखर कारखाने अधिक महिने चालवले आहेत.काही कारखान्यांना एप्रिल महिन्यापासून सुरूवात झाली. मात्र, अनेक राजकीय नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत आहेत. त्यामुळे राज्य साखर आयुक्तालयाने राज्यभरातील सात साखर कारखान्यांना आरआरसीनुसार नोटीस बजावल्या आहेत.

नोटीस बजावण्यात आलेल्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, बबनराव पाचपुते, कल्याणराव काळे यांची नावे आहेत. ७० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी देणारे हे कारखाने असून त्यांनी एकूण १४५०३.५९ लाख आरआरसी रक्कम थकवली असल्याचे आयुक्तांनी जाहीर केले आहे.

- Advertisement -

कोणत्या साखर कारखान्यांना आयुक्तांचा दणका?

1) पुणे- राजगड सहकारी साखर कारखाना लिं. भोर- आरआरसी रक्म २५९१.६९ लाख ( संबंधित राजकीय नेते – आमदार संग्राम थोपटे – काँग्रेस)

2) सोलापूर – सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना, पंढरपूर – आरआरसी रक्कम 3674.90 लाख (संबंधित राजकीय नेते – कल्याणराव काळे , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)

- Advertisement -

3) बीड – वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, परळी – आरआरसीसी रक्कम – 4615.75 लाख ( संबंधित राजकीय नेते – माजी मंत्री पंकजा मुंडे, भाजप)

4) बीड – आंबेजोगाई सहकारी साखर कारखाना, आंबेजोगाई, -आरआरसी रक्कम 814.15 ( संबंधित राजकीय नेते – माजी मंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)

5) उस्मानाबाद – जयलक्ष्मी शुगर प्रो.नितळी – आरआरसी रक्कम – 340.69 लाख ( संबंधित राजकीय नेते – विजयकुमार दांडनाईक, भाजप)

6) अहमदनगर – साईकृपा साखर कारखाना, हरिडगाव, अहमदनगर – आरआरसी रक्कम -2054.50 लाख – ( संबंधित राजकीय नेते – आमदार बबनराव पाचपुते,भाजप)

7) सातारा – किसनवीर ससाका भुईंज, सातारा – आरआरसी रक्कम – 411.91 लाख ( संबंधित राजकीय नेते – आमदार मकरंद पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)


हेही वाचा : नवनीत राणांच्या जीवाला धोका? निनावी पत्र पाठवून हितचिंतकाने केले सावध


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -