घरताज्या घडामोडीनवनीत राणांच्या जीवाला धोका? निनावी पत्र पाठवून हितचिंतकाने केले सावध

नवनीत राणांच्या जीवाला धोका? निनावी पत्र पाठवून हितचिंतकाने केले सावध

Subscribe

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जीवाला धोका असल्याचे पत्र मिळल्याने एकच खळबळ उडाली आहे. नवनीत राणा यांचा हिचतिंचक असणाऱ्या अज्ञात व्यक्तीने खासदारांना पत्र पाठवून माहिती दिली आहे. काही संशयीत लोक राजस्थान सीमेवरून अमरावती येथे आल्याचे पत्रात नमूद आहे.

निनावी पत्र पाठवणारी व्यक्ती ही अमरावती येथील असून ती खासदारांची वेलविशर आहे. निनावी पत्राच्या सरतेशेवटी खुदा हाफीस असा उल्लेख करण्यात आला आहे.

- Advertisement -

पत्रात काय म्हटलंय?

मी माझं नाव तुम्हाला सांगू शकत नाही. मी आपल्या शहरातील सर्वसामान्य व्यक्ती आहे. मी शासकीय नोकरी करत आहे. काही लोक आपला पाठलाग करीत असल्याची माहिती असून आपण सांभाळून राहावे.अमरावती शहरात राजस्थानच्या सीमेवरून काही संशयीत लोक आले आहेत. हे लोक तुमच्या घरी येऊन गेले आहेत, असं या पत्रात लिहिलं आहे.

- Advertisement -

खासदार राणांनी मला खुप मदत केली आहे. बदली करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. कोरोना काळात देखील त्यांनी मला भरपूर सहकार्य केले आहे. पण माझी देवाला प्रार्थना आहे की, आपल्यासोबत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये. तसेच पत्राच्‍या शेवटी खुदा हाफिज, असं लिहिलं आहे.

दरम्यान, खासदार नवनीत राणा या सध्‍या दिल्‍लीत असून त्‍यांचाकडून अद्यापही कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाहीये. हे पत्र नवनीत राणा यांच्‍या जनसंपर्क कार्यालयाकडून प्रसारीत करण्‍यात आले आहे. राणांच्या गंगा सावित्री या निवासस्थानी आलेल्या पत्रानंतर आता सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.


हेही वाचा : अजान सुरू होताच आदित्य ठाकरेंनी थांबवलं भाषण, अन् सभास्थळावर…


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -