घरमहाराष्ट्र...तर अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं; काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं वक्तव्य

…तर अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं; काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं वक्तव्य

Subscribe

का‌ॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री पदाची इच्छा करण्यात गैर काय?, असं म्हणत जर अजित पवारांकडे 145 चा आकडा असेल तर त्यांनी मुख्यमंत्री व्हावं असं भाष्य केलं आहे.

मागच्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय उलथापालथ सुरु असल्याच्या चर्चा आहेत. त्यातच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत 2024 ला मुख्यमंत्री होण्याची इच्छा असल्याचं म्हटलं.  त्यानंतर आता का‌ॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री पदाची इच्छा करण्यात गैर काय?, असं म्हणत जर अजित पवारांकडे 145 चा आकडा असेल तर त्यांनी मुख्यमंत्री व्हावं असं भाष्य केलं आहे. ( Congres leader Nana Patole commented that if Ajit Pawar has the number of 145 he should become the Chief Minister )

राष्ट्रवादीच्या हालचालींवर  काॅंग्रेसचं लक्ष 

राज्यातील राजकीय स्थिती पाहता अजित पवारांच्या मनातील खदखद बाहरे निघत आहे का? यावर नाना पटोले यांनी उत्तर देताना म्हटले की, हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे. मी त्यावर काय बोलणार. राज्यात अनेक प्रश्न आहेत, त्यावर बोलायला हवं परंतु राज्यात अलिकडे राजकीय स्फोट होणार, वगैरे सुरु आहे. अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतरही, मीडियामधून ते पक्ष सोडणार असल्याच्या बातम्या येतच राहतात, असं नाना पटोले यावेळी म्हणाले. तसंच, राष्ट्रवादीत कोण कोणाला भेटत हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु आम्ही या सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहोत, असं नाना पटोले म्हणाले.

- Advertisement -

खदखद होती तर सत्तेतून बाहेर पडायचं होतं

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, २०१०- २०१४ साली काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अजित पवार होते. त्यांचा नाईलाज होता तर त्यांनी मंत्रीपदाची शपथ कशासाठी घेतली? मंत्रीपदाची शपथ घ्यायला नको होती. पृथ्वीराज चव्हाण आमचे नेते आहेत, त्यांच्याबद्दल अजित पवारांनी असे बोलावी ही अपेक्षा नाही. खदखद वाटत होती तर त्यावेळीच सोडून जायला हवे होते. तसेच राजकारणातील कोणीही मुख्यमंत्री व्हायची इच्छा बाळगली तर त्यात वावगे काहीच नाही, अजित पवार यांच्याकडे १४५ चा बहुमताचा आकडा असेल तर त्यांनी जरूर मुख्यमंत्री व्हावे, असे नाना पटोले म्हणाले.

केंद्रातलं भाजरचं सरकार तानाशाही

केंद्रात बसलेललं भाजपचं सरकार तानाशाही आहे. त्यांच्याविरोधात जो कोणी बोलेले त्याच्यामागे हे ईडी- सीबीआय लावतात. तसचं त्यांच्याकडे कोणी नेता आला की त्याच्यावरचे सर्व भ्रष्टाचाराचे आरोप ते त्यांच्याकडच्या पावडरने धुतात. सत्यपाम मलिक यांनी केलेलं वक्तव्य योग्य आहे. त्यांनी मोदी सरकारचा खरा चेहरा सर्वांसमोर आणला आहे, म्हणून त्यांची आज सीबीआय चौकशी होतं आहे, असंही नाना पटोले म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -