घरमहाराष्ट्र2024 ला शिंदे गटाचा पराभव झाला तर, निवडणूक आयोग आम्हाला शिवसेना देणार...

2024 ला शिंदे गटाचा पराभव झाला तर, निवडणूक आयोग आम्हाला शिवसेना देणार का? – संजय राऊत

Subscribe

जळगाव : आमदार खासदारांच्या संख्येवर शिवसेना कोणाची हे निवडणूक आयोगाने ठरवले असेल तर 2024 ला शिंदे गटाचा पराभव झाला तर निवडणूक आयोग पुन्हा शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण देणार का? असा प्रश्न संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केला आहे. ते सध्या जळगाव दौऱ्यावर आहेत.

उद्या जळगावमधील पाचोऱ्यात शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सभा होणार आहे. यानिमित्त संजय राऊत जळगाव दौऱ्यावर असून त्यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. काल बातमी होती की, उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी शिंदे गट आक्रमक झाले होते. पण संजय राऊतांनी हे साफ खोटे असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की, रेल्वेच्या प्लॅटफॉमवर शिवेसेनेची  (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एवढी गर्दी उसळली होती. त्यामुळे त्याच्या गटातील कोणी धाडस केले अस मला वाटत नाही. शेवटी शिवसेना ही मूळ शिवसेना आहे. त्यांनी चोऱ्या-माऱ्या केल्या, लफंगेगीरी केली, निवडणूक आयोगाला बोगस कागदपत्रे तयार करून दिल्यामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण निवडणूक आयोगाने त्यांच्या हातात दिले आहे. पण तसे असेल तरी जळगावातली शिवसेना ही मूळ शिवसेना, शिवसैनिक, पदाधिकारी सर्व इथे आहेत, उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत.

- Advertisement -

आमदार गेले असतील पण आमदार म्हणजे शिवसेना नाही, खासदार म्हणजे शिवसेना नाही. आमदार आणि खासदारांच्या संख्येवर शिवसेना कोणाची आहे हे निवडणूक आयोगाने ठरवले असेल तर 2024 ला याचा पराभव होईल तेव्हा निवडणूक आयोग पुन्हा आम्हाला शिवसेना देणार का? असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, जळगावातील शिवसेना आमच्या सोबत आहे. निवडणूक आयोगाने कोणत्याक्षणी निवडणूक विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक घेतल्यास जळगावातील लोक आम्हाला जिंकवून देतील.

दरम्यान, महाराष्ट्रात 20 जून 2022 रोजी विधानपरिषदेची निवडणूक झाली. या निवडणुकीच्या रात्री एकनाथ शिंदे आणि काही आमदार सुरतच्या दिशेने रवाना झाले होते. पहाटेच्या सुमारास एकनाथ शिंदे हे 16 आमदारांसह संपर्काबाहेर असल्याचे लक्षात आले. शिवसेनेच्या 40 आमदारांसह 52 आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सूरत आणि तेथून गुवाहाटीला रवाना झाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -