घरभविष्यपंचग्रही योग! 'या' 4 राशींच्या व्यक्तींसाठी असणार अक्षय्य तृतीया शुभ

पंचग्रही योग! ‘या’ 4 राशींच्या व्यक्तींसाठी असणार अक्षय्य तृतीया शुभ

Subscribe

आज वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हिंदू धर्मात अक्षय्य तृतीया सण साजरा केला जातो. हा दिवस ज्योतिष शास्त्राच्या दृष्टिकोनातूनही विशेष मानला जातो. अक्षय्य तृतीयाचा दिवस शुभ कार्य करण्यासाठी शुभ काळ मानला जातो. आज सौभाग्य आणि आनंदाचा कारक गुरु ग्रह राशीपरिवर्तन करत मेष राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे मेष राशीत पंचग्रही योग तयार होत आहे. मेष राशीमध्ये सूर्य, बुध, राहू आणि युरेनस आधीपासूनच आहेत. अशातच हा दिवस अधिक खास बनत आहे.

या राशींच्या व्यक्तींसाठी असणार अक्षय्य तृतीया शुभ

- Advertisement -
  • मेष

अक्षय्य तृतीयेला तयार होणारा पंचग्रही योग मेष राशीच्या लोकांसाठी खूप लाभदायक असेल. हा योग फक्त मेष राशीत तयार होत असल्याने मेष राशींच्या व्यक्तिंचे भाग्य उजळेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. धनलाभ होईल. समस्या दूर होतील.

  • वृषभ

अक्षय्य तृतीयेला बनलेला पंचग्रही योग वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ आहे. या काळात नोकरीत सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. व्यवसायात वाढ होईल.

- Advertisement -
  • वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीया जीवनात सुख-समृद्धी वाढवणारी ठरेल. नवीन घर-गाडी, दागिने इत्यादी खरेदी करू शकता. करिअरसाठी चांगला काळ. व्यवसायात लाभ होईल.

  • कर्क

अक्षय्य तृतीयेला तयार झालेल्या पंचग्रही योगामुळे कर्क राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल. उत्पन्नात वाढ होईल. नोकरीत प्रगती होईल. व्यवसायात लाभ होईल. नवीन काम सुरू करू शकाल. आर्थिक स्थिती चांगली राहील.


हेही वाचा : पितृ दोष योगामुळे ‘या’ 3 राशींना करावा लागणार अडचणींचा सामना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -