घरमहाराष्ट्रCongress : मोदी पुन्हा सत्तेत आल्यास तुरुंगात जावे लागेल! रमेश चेन्नीथला यांची...

Congress : मोदी पुन्हा सत्तेत आल्यास तुरुंगात जावे लागेल! रमेश चेन्नीथला यांची भीती

Subscribe

आता आपल्यासमोर करा किंवा मरा अशी परिस्थिती असल्याचे सांगत चेन्नीथला यांनी भाजप आणि मोदी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर सातत्याने टीका करत असतात. त्यामागे गांधी-नेहरुंची विचारधारा संपवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोप केला.

मुंबई : नरेंद्र मोदी आणि भाजप लोकशाहीला संपवण्यासाठी बसले आहेत. ते लोकशाही, संविधान काहीच मानत नाहीत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मोदी पुन्हा सत्तेत आले तर अनेकांना तुरुंगात जावे लागले, अशी भीती काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शनिवारी (17 फेब्रुवारी) व्यक्त केली. (Congress If Modi comes back to power he will have to go to jail Fear of Ramesh Chennithala)

आता आपल्यासमोर करा किंवा मरा अशी परिस्थिती असल्याचे सांगत चेन्नीथला यांनी भाजप आणि मोदी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर सातत्याने टीका करत असतात. त्यामागे गांधी-नेहरुंची विचारधारा संपवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोप केला.

- Advertisement -

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वतीने लोणावळ्यात राज्यस्तरीय शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप करताना चेन्नीथला यांनी भाजप विरुद्ध रणशिंग फुंकले. लोकसभेच्या निवडणुकीसाठी फार कमी वेळ राहिला आहे. आता निवडणुका शास्त्रोक्त पद्धतीने लढवल्या पाहिजेत, यावर चर्चा झाली आहे. बुथ व्यवस्थापन हे सर्वात महत्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.

इंडिया आघाडीला सत्तेत आणण्यासाठी काम केले पाहिजे. राज्यातून 48 जागा जिंकण्याचे लक्ष ठेवा. तसेच पक्षात शिस्त असली पाहिजे. कोणी काहीही बोलावे हे चालणार नाही. एनएसयुआय, युवक काँग्रेस, फ्रंटल सेल त्यांच्याही प्रदेश स्तरावर बैठका झाल्या पाहिजेत, असे चेन्नीथला यांनी पदाधिकाऱ्यांना सुनावले.

- Advertisement -

तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना पक्षाच्या अजेंड्यावर काम करण्याचा सल्ला दिला. आपल्याला लोकसभेची लढाई जिंकायची आहे. आता आपल्याकडे वेळ नाही, युद्ध पातळीवर काम करायचे आहे. भाजप कसे खोटे बोलत आहे, जनतेची फसवणूक करत आहे हे लोकांमध्ये जाऊन सांगा, कुठेही कमी पडू नका, असे आवाहनही त्यांनी केले. नरेंद्र मोदींच्या सत्तेचे दरवाजे महाराष्ट्र बंद करु शकतो हे लक्षात घ्या, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : Lonar Lake : लोणार सरोवराच्या पाणीपातळीत वाढ; कमळजा माता मंदिराच्या पायऱ्यांना स्पर्श

भाजप आणि नरेंद्र मोदी सत्तेवर राहता कामा नये ते देशासाठी हिताचे नाही, अशा शब्दात काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी हल्ला चढवला. काँग्रेसची पिछेहाट झालेली नाही तर तत्वज्ञानाची पिछेहाट होत आहे. शिबीरे कमी झाली म्हणून विचाराची पिछेहाट झाली आहे. आपल्याकडे परंपरा, तत्त्वज्ञान, विचार, काँग्रेस सरकारने केलेले काम आहे. काँग्रेसने देशासाठी बलिदान दिले आहे. आपण काँग्रेस पक्षाचे आहोत, याचा अभिमान असला पाहिजे,असेही थोरात म्हणाले.

हेही वाचा : Supriya Sule : देणार असालच तर तगडा उमेदवार द्या…सुप्रिया सुळे यांचे आव्हान

सध्या व्यावसायिक राजकारण झाले आहे. सत्ता आली की तिकडे जायचे, पुन्हा काँग्रेसची सत्ता आली की पुन्हा काँग्रेसमध्ये यायचे. हे चालणार नाही, अशी भूमिका घेतली पाहिजे. सत्तेत जायचे, पैसे कमवायचे असले धंदेवाईक राजकारण चालू देऊ नका. अशांना काँग्रेस पक्षात स्थान देऊ नका, अशी मागणीही त्यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -