घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरLonar Lake : लोणार सरोवराच्या पाणीपातळीत वाढ; कमळजा माता मंदिराच्या पायऱ्यांना स्पर्श

Lonar Lake : लोणार सरोवराच्या पाणीपातळीत वाढ; कमळजा माता मंदिराच्या पायऱ्यांना स्पर्श

Subscribe

लोणार सरोवरामध्ये सातत्याने काहींना काही बदल होतांना दिसतात. यामुळे कुतुहालापोटी पर्यटक, भाविक तसेच अभ्यासू नागरिकांची गर्दी वाढत असल्याचे दिसत आहे. तसेच सरोवरातील जल पातळीत वाढ होत असल्याने निसर्गप्रेमी व पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. मात्र जलपातळीत नेमकी कशामुळे वाढ झाली आहे हे गूढ अजून उलगडलेले नाही.

लोणार (बुलढाणा) : जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या लोणार सरोवरोमधील जलपातळीत सातत्याने वाढ होत आहे. जाणकरांनी वाढत्या जलपातळीत बाबत चिंता वर्तवली आहे. काही वर्षांपूर्वी सरोवराच्या पाण्याचा रंग बदलल्याने मोठे कुतूहल निर्माण झाले होते. तसेच आता सरोवराच्या जलपातळीत वाढ होत असल्याने दर्शनासाठी सहज जाता येत असलेली दर्शनस्थळे पाण्याने व्यापलेली दिसत आहे. (Lonar Lake Increase in water level of Lonar Lake Touch the steps of Kamalja Mata Temple)

लोणार सरोवरामध्ये सातत्याने काहींना काही बदल होतांना दिसतात. यामुळे कुतुहालापोटी पर्यटक, भाविक तसेच अभ्यासू नागरिकांची गर्दी वाढत असल्याचे दिसत आहे. तसेच सरोवरातील जल पातळीत वाढ होत असल्याने निसर्गप्रेमी व पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. मात्र जलपातळीत नेमकी कशामुळे वाढ झाली आहे हे गूढ अजून उलगडलेले नाही.

- Advertisement -

जागतिक पर्यटनस्थळ लोणार सरोवर हे धार्मिक, ऐतिहासिक, वैज्ञानिकदृष्ट्या खूप महत्वपूर्ण आहे. यामुळे या ठिकाणी होणाऱ्या प्रत्येक बदलावर सर्व स्तरावर खूप बारकाईने लक्ष ठेवून नोंदी घेतल्या जातात. त्याचाच हा भाग म्हणून सरोवराच्या जलपातळीत सतत वाढ होत असल्याने साहजिकच कुतूहलाचा आणि संशोधनाचा विषय झाला आहे. सरोवराच्या जलपातळीत वाढ का होत या बद्दल ठोस कारण अजून समोर आलेले नाही. सरोवराच्या जलपातळीत वाढ होत राहिल्यास पाण्याच्या मूळ गुणधर्मामध्ये काही फरक पडेल का? फरक पडल्यास त्याचा सरोवराच्या नैसर्गिक साधन संपत्तीवरही काही फरक पडेल का? सरोवर परिसरात राहणाऱ्या प्राणी व पक्षांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो असे अनेक प्रश्न कमळजा माता मंदिरापर्यंत पाणीपातळी वाढल्याने उपस्थित होत आहेत.

हेही वाचा : IND Vs ENG Test : तिसऱ्या दिवसअखेर भारताकडे 322 धावांची आघाडी; जैस्वालचे पुन्हा शतक

- Advertisement -

एवढे पाणी जातेय दररोज सरोवरात

लोणार सरोवराच्या कमळजा माता मंदिरापासून मे 2020 मध्ये अंदाजे सुमारे 38 मीटर आत पर्यंत पाणी आटले होते. त्यामुळे सासू- सुनेची विहीर उघडी पडली होती. मात्र, आता सासू-सुनेची विहीर पाण्याने वेढली गेली आहे. लोणार धारतीर्थ पापहारेश्वर तसेच सीतान्हाणी या तिन्ही ठिकाणावरून सरोवरात येणाऱ्या प्रति तास अंदाजे 43,850 लिटर पाणी प्रत्येक दिवसाला अंदाजे 10,52,400 लिटर पाणी हे सरोवराच्या परिसरात जाते.

हेही वाचा : Mahim Sea Food Plaza : मुंबईतील पहिला ‘माहिम सी फूड प्लाझा’, 40 हजार पर्यटकांनी दिली भेट

लोणार सरोवराविषयी माहिती

लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे. जगात तिसऱ्या क्रमांकाचे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. या सरोवराची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली. लोणार सरोवर हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. याचे पाणी अल्कधर्मी आहे. लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. तसेच या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. त्यातील 15 मंदिरे विवरातच आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -