घरताज्या घडामोडीमोदींमुळे विश्वाची उत्पत्ती झाली, असेही चंद्रकांत पाटील बोलू शकतील - कॉंग्रेसची टीका

मोदींमुळे विश्वाची उत्पत्ती झाली, असेही चंद्रकांत पाटील बोलू शकतील – कॉंग्रेसची टीका

Subscribe

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना भारताचे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या नेमणुकीवर केलेल्या वक्तव्यामुळे आता राजकारण तापू लागले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे आता त्यांना कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी लक्ष्य करायला सुरूवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ए पी जे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केले असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. याच विधानावर कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही टीका करत चंद्रकांत पाटील यांना टोला हाणला आहे. एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती झाले तेव्हा मोदींमुळे झाले हे सांगितले नाही. आता अटलजी व एपीजे अब्दुल कलाम नाहीत. चायवाला म्हणून व पदवी घेताना कोणी पाहिले नाही. मोदींच्या बाललीलांचे पुरावे द्यायचे नसल्याने भविष्यात मोदींमुळे विश्वाची उत्पत्ती झाली असे चंद्रकांत पाटील बोलू शकतील असे सचिन सावंत यांनी केलेल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवाब मलिक यांनीही चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यातर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांना राजधर्म पाळण्याचा सल्लाची आठवण करून दिली आहे. एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती करण्याचा निर्णय त्यावेळी एकमताने झाला होता. त्यात कुठेही नरेंद्र मोदी यांचा सहभाग नव्हता याची आठवण नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांना करून दिली आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडून नरेंद्र मोदी त्यावेळी धडे घेत होते. अटल बिहारींनीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजधर्माचे धडे दिली अशीही आठवण नवाब मलिक यांनी करून दिली आहे.

नवाब मलिक यांनी कोरोनाच्या लसीकरणाच्या मोहीमेवरही टीका केली आहे. कोरोना लसीकरण संपेपर्यंत मोदी सरकार राहणार नाही, असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या केसेस दिवसेंदिवस लक्षणीय वाढत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. सरकारी पातळीवर सर्व यंत्रणांना कोरोनाच्या नियमावलीचे काटेकोरेपणे पालन करण्यासाठी आदेश दिले आहेत असेही त्यांनी सांगितले. तर दुसरीकडे भाजप राजकीय कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेत असल्याचेही त्यांनी यावेळी म्हणाले. भाजप हजारो लोक गोळा करून सभा घेत आहे. लॉकडाऊननंतर अनेक गोष्टी खुल्या करण्याची मागणी विरोधकांनीच केली होती असेही ते म्हणाले. त्यामुळे आता टीका करण्याचा त्यांचा अधिकार नाही असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -