Saturday, February 20, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम धक्कादायक! डॉक्टरने कुटुंबाला विषारी इंजेक्शन देऊन स्वत: केली आत्महत्या

धक्कादायक! डॉक्टरने कुटुंबाला विषारी इंजेक्शन देऊन स्वत: केली आत्महत्या

आपल्या कर्णबधीर मुलाच्या व्याधीला कंटाळून हा निर्णय घेतल्याचे सुसाइट नोटमध्ये म्हटले होते.

Related Story

- Advertisement -

डॉक्टर हा माणसाठी देव असतो. डॉक्टररुपी देव हा आपल्याला संकटातून बाहेर काढतो. मात्र कर्जतमधील एक प्रकार सर्वांसाठीच धक्कादायक आहे. आपल्या कर्णबधीर मुलाच्या त्रासाला कंटाळून एका डॉक्टर वडिलांनी आपल्या कुटुंबासोबत आत्महत्या केली. कर्जत तालुक्यातील राशीन येथील डॉक्टर महेंद्र थोरात असे त्यांचे नाव आहे. आत्महत्या केल्यानंतर त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमधून आत्महत्येमागचे धक्कादायक समोर आले. आपल्या कर्णबधीर मुलाच्या व्याधीला कंटाळून हा निर्णय घेतल्याचे सुसाइट नोटमध्ये म्हटले होते. त्याचप्रमाणे आपली सर्व संपत्ती कर्णबधीर मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेला दान करावी अशी इच्छाही त्यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. थोरात यांच्या घरात डॉक्टर थोरात त्यांची पत्नी वर्षा, मोठा मुलगा कृष्णा आणि छोटा मुलगा कैवल्य यांचे मृतदेह समोर आले. पत्नी आणि मुलांना विषारी इंजेक्शन देण्यात आले होते. त्यानंतर डॉक्टर थोरात यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टर थोरात यांचा मोठा मुलगा कृष्णा हा कर्णबधीर होता. त्याला कानाने ऐकू येत नसल्याने समाजात त्याला चांगली वागणूक मिळत नव्हती. त्याला याचा त्रास होत होता. तो कोणाशीही काहीही बोलत नव्हता मात्र त्याचा होणारा त्रास आम्हाला कळत होता म्हणून आम्ही सहमताने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असे त्यांच्या सुसाइड नोटमध्ये स्पष्टपणे म्हटले होते. त्याचप्रमाणे आमच्या या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरु नये. असे वागणे आम्हाला योग्य वाटत नाही मात्र त्यावर इलाज नाही, आम्हाला माफ करा असेही सुसाइड नोटमध्ये म्हटले होते.

- Advertisement -

कृष्णाला ऐकू येण्यासाठी डॉक्टर वडिलांनी खूप प्रयत्न केले होते. त्याला कानाचे मशीनही घेऊनही दिले होते मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. कृष्णाला क्रिकेटमध्ये विशेष आवड होती. वडिल डॉक्टर असल्याने अनेक उपचार सुरु होते मात्र नियतीच्या मनात जे होते तेच झाले. या घटनेनंतर सर्वत स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.


हेही वाचा – मुंबईत ड्रग्जमिश्रीत औषधांच्या तस्करीत एका आरोपीला अटक

- Advertisement -