घरमहाराष्ट्रपंतप्रधानांच्या 'त्या' विधानामागे रणनीती होती का? - पृथ्वीराज चव्हाण

पंतप्रधानांच्या ‘त्या’ विधानामागे रणनीती होती का? – पृथ्वीराज चव्हाण

Subscribe

आज काँग्रेसने देशभरात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसने पत्रकार परिषद आयोजित केली. चीनची घुसखोरी, अतिक्रमण मान्य नाही, असं काँग्रेसने म्हटलं आहे. चीनने घुसखोरी केली नाही, असं पंतप्रधानांनी का म्हटलं? असा सवाल काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. देशाच्या संरक्षणासाठी केंद्राच्या सर्व निर्णयांना आम्ही सहकार्य करणार आहे. लडाखमध्ये चीनने केलेल्या घुसखोरीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. चीनची घुसखोरी कदापि मान्य नाही.

संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री यांनी चीनच्या अतिक्रमणावर वेगवेगळ्या पद्धतीने अधिकृत विधानं केली आहेत. भारताच्या भागात चीनने बांधकाम केलं आदी वक्तव्य केली. यानंतर सर्वपक्षिय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हद्दीत कोणाही घुसखोरी केलेली नाही, असं विधान केलं. यानंतर पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्रमंत्र्यांच्या कार्यालयाने सारवासारव केली. पंतप्रधानांच्या विधानाचं चीनने कौतूक करत आम्ही घुसखोरी केली नाही असा दावा केला. चीनमध्ये आता पंतप्रधान मोदी लोकप्रिय झाले आहेत, असा टोला त्यांनी लगावला. चीनच्या कटकारस्थानला पंतप्रधानांनी बळ देऊ नये. चीनच्या राष्ट्राध्यक्षांसोबत मोदींचे चांगले संबंध असल्याचं सर्वांना माहिती आहे. त्यांना न दुखावण्याचा त्यामागे काही विचार होता का ? पण यामुळे वाटाघाटी करताना भारताची भूमिका दुबळी झाली आहे का ? याचं उत्तर मिळालं पाहिजे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी म्हटलं.

- Advertisement -

गलवान नदीपात्राच्या परिसरात चीनकडून रस्ते बांधणी केली जात आहे. पूर्व लडाखमधअये चिनी सैनिक तंबू उभारत आहेत. सॅटेलाईट फोटोंमधून चीनच्या कुरापती समोर येत आहेत. एप्रिल-मे २०२० पासून चीनने गलवानमध्ये कितीवेळा अतिक्रमण केलं? चीनने घुसखोरी केली नाही असं विधान पंतप्रधान मोदींनी का केलं? असा सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी केला आहे. पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्याचं अजून स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. कोणती रणनीती होती का? याबाबत अद्याप माहिती दिलेली नाही. देशाच्या सुनिश्चिततेला धोका निर्माण झाल्यावर प्रश्न उपस्थित करणं आणि स्पष्टीकरण मागणं विरोधकांचं काम आहे. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं सरकारची जबाबदारी आहे. प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी सरकारचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.


हेही वाचा – व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द

- Advertisement -

१५-१६ जूनपूर्वीची परिस्थिती आणण्यासाठी काय प्रय्तन केले? मोदींच्या दाव्याबद्दल केंद्र सरकार कधी स्पष्टीकरण देणार? पँगाँग सरोवरमध्ये चीनने नविन बांधकाम केलं आहे, हे खरं आहे का? असे प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारला केले आहेत. पंतप्रधानांचं विधानानंतर चीनची वाटाघाटी करण्याची परिस्तिती बळकट होत आहे का? याबद्दल स्पष्टीकरण देण्याची आमची मागणी आहे, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचं सोमवारी आंदोलन 

गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढ हात आहे. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस सोमवारी राज्यभर आंदोलन करणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली. अर्थव्यवस्थेला बळ देण्याऐवजी केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवत आहेत. या संदर्भात सोमवारी राज्यभर आंदोलन करणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली.

बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, “काँग्रेस २९ तारखेला इंधन दरवाढीविरोधात एक तासाचं आंदोलन करणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे. यासोबत केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात येणार आहे.”

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -