घरमहाराष्ट्रCongress: व्हेलेंटाईन डेला कळणार काँग्रेससोबत किती आमदारांची गाठ पक्की?

Congress: व्हेलेंटाईन डेला कळणार काँग्रेससोबत किती आमदारांची गाठ पक्की?

Subscribe

काँग्रेस हायकमांड आता अलर्ट मोडवर आली आहे. 14 फेब्रुवारी, व्हॅलेंटाइनडे च्या दिवशी काँग्रेस पक्षश्रेष्ठींची बैठक बोलावली आहे.

मुंबई:राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा आणि पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण लवकरच भाजपात प्रवेश करणार, असं बोललं जात आहे. त्यांच्यासोबत अनेक आमदारही पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या आहेत. त्यामुळे काँग्रेस हायकमांड आता अलर्ट मोडवर आली आहे. 14 फेब्रुवारी, व्हॅलेंटाइनडे च्या दिवशी काँग्रेस पक्षश्रेष्ठींची बैठक बोलावली आहे. या बैठकीत काँग्रेसचे आमदार पक्षासोबत राहतात की पक्ष सोडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Congress Valentine s Day will know how many MLAs are sure to tie up with Congress)

तातडीनं बोलावली बैठक

काँग्रेसने बोलावलेल्या या बैठकीमुळे सध्या काँग्रेससोबत किती आमदार आहेत, हे स्पष्ट होणार आहे. शिवाय आमदारांचा कल कसा आहे, ते जाणून घेण्यासाठी पक्ष नेतृत्वाला मदत होणार आहे. याशिवाय जे काँग्रेस आमदार सध्या काठावर आहेत, त्यांची मनं वळवण्याचाही प्रयत्न काँग्रेसकडून केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीत आमदार काँग्रेसच्या प्रेमाला साथ देणार की दुसऱ्या पक्षाचा हात धरणार हे पाहावं लागणार आहे.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का?

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. महाराष्ट्रातही मागील काही दिवसांपासून काँग्रेसचे आमदार, नेते हे पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. त्यामुळे हायकमांड महाराष्ट्र काँग्रेस नेतृत्त्वावर नाराज असल्याचंही बोललं जात आहे.

पक्ष सोडल्यानंतर चव्हाणांची प्रतिक्रिया 

अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडण्यामागील आपली भूमिकाही स्पष्ट केली. प्रत्येक गोष्टीला कारण असलचं पाहिजे, असे काही नाही. मी जन्मापासून आतापर्यंत काँग्रेस पक्षाचे काम केले आहे. आता मला वाटते की, मी अन्य पर्यायांचा विचार केला पाहिजे. त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा दिला आहे. आता मी विचार करून पुढची दिशा ठरवेन. तसंच, मी दुसऱ्या पक्षात जाण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. येत्या दोन दिवसांमध्ये मी माझी पुढील राजकीय दिशा स्पष्ट करेल, असे अशोक चव्हाण यांनी सांगितलं. तसंच मला कुठल्याही पक्षांतर्गत गोष्टीची वाच्यता करायची नाही. मला कोणाचीही उणीदुणी काढायची नाहीत. तो माझा स्वभाव नाही, असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

मी पक्षासाठी खूप केलंय- अशोक चव्हाण

पक्ष का सोडत आहात? यावर चव्हाण म्हणाले की, पक्षाने मला खूप दिलं हे खरं पण मीही पक्षासाठी खूप केलं आहे. मी पक्षात असेपर्यंत प्रामाणिकपणे काम केलं आहे. पक्षाने मला मोठं केलं असेल तर मीपण पक्षासाठी काही कमी केलं नाही.

(हेही वाचा: Ashok Chavan: ‘अशोक चव्हाणांना होती ईडीची भीती’; प्रणिती शिंदेंनी सांगितला त्यांचा प्लॅन)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -