घरमहाराष्ट्रMaharashtra Politics : अशोक चव्हाणांचा राजीनामा अन् आठवलेंकडून पुन्हा खुली ऑफर

Maharashtra Politics : अशोक चव्हाणांचा राजीनामा अन् आठवलेंकडून पुन्हा खुली ऑफर

Subscribe

मुंबई : दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत, तर अगदी दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला आहे. यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि विधिमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आता ते भाजपासोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अशोक चव्हाण यांना येण्याची खुली ऑफर दिली आहे. (Maharashtra Politics Ashok Chavan resignation and Ramdas Athawale open offer again)

हेही वाचा – Maharashtra Politics : ‘ऑपरेशन लोटस’च्या कार्यपद्धतीवर जनता नाराज; थोरात स्पष्टच बोलले

- Advertisement -

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर रामदास आठवले यांनी ट्वीट करताना म्हटले की, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन चांगला निर्णय घेतला आहे. मी त्यांच्या निर्णयाचे अभिनंदन करतो. अशोक चव्हाण यांनी आता महायुतीमध्ये यावे. तसेच महायुती मधील माझ्या रिपब्लिकन पक्षात प्रवेश करावा, असे मी त्यांना आवाहन करतो, असे रामदास आठवले म्हणाले आहेत. दरम्यान, सांगायचे झाले तर यआधीही रामदास आठवले यांनी प्रत्येक पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर देतात.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Politics : चौकशीखालील नेत्यांना रिंगमास्टर मोदी नाचवणार; आंबेडकरांची जहरी टीका

अशोक चव्हाण काय म्हणाले?

दरम्यान, आपल्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण म्हणाले की, प्रत्येक गोष्टीला कारण असलचं पाहिजे, असं काही नाही. मी जन्मापासून आतापर्यंत काँग्रेस पक्षाचे काम केले आहे. आता मला वाटते की, मी अन्य पर्यायांचा विचार केला पाहिजे. त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता मी विचार करून पुढची दिशा ठरवेन. मात्र मी दुसऱ्या पक्षात जाण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. येत्या दोन दिवसांमध्ये मी माझी पुढील राजकीय दिशा स्पष्ट करेल, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -