घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरNew Year Celebration : एका दिवसाचा दारू पिण्याचा परवाना काढण्याकडे तळीरामांची पाठ

New Year Celebration : एका दिवसाचा दारू पिण्याचा परवाना काढण्याकडे तळीरामांची पाठ

Subscribe

राज्याला सर्वाधिक महसूल मिळतो तो मद्य विक्रीतून. हेच मद्य 31 डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात खपत असल्याने राज्य शासनाने मद्य विक्रीच्या वेळेत बदलही केला आहे.

बीड : नवं वर्षाचं स्वागत करण्याची तयारी सुरू झाली आहे. अशातच थर्टी फर्स्टची पार्टी करण्याचा अनेकांनी बेत आखला आहे. 31 डिसेंबरला दारू ढोसण्याच्या तयारी असलेली तळीराम मात्र, एका दिवसाचा दारू पिण्याचा तात्पुरता परवाना काढण्याकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात बघायला मिळत आहे. (New Year Celebration Talirams back to one-day liquor license)

राज्याला सर्वाधिक महसूल मिळतो तो मद्य विक्रीतून. हेच मद्य 31 डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात खपत असल्याने राज्य शासनाने मद्य विक्रीच्या वेळेत बदलही केला आहे. थर्टी फर्स्टच्या उत्साहावर विरजण पडू नये म्हणून 31 डिसेंबर रोजी पहाटे 1 वाजेपर्यंत मद्य विक्रीस परवानगी दिली आहे, तर महानगरांमध्ये पहाटे 5 वाजेपर्यंत ही परवानगी असणार आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात 31 डिसेंबर रोजी पहाटे 1 वाजेपर्यंत देशी, विदेशी मद्य विक्री व बिअर विक्री सुरू राहणार आहे. असे असतानाच याच जिल्ह्यात दारू पिण्याचा एका दिवसाचा तात्पुरता परवाना काढण्याकडे तळीरामांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Corona India Update : देशात 24 तासांत 692 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 6 जणांचा मृत्यू

दारू पिऊन वाहन चालवाल तर खबरदार…

दारू पिऊन वाहन चालवणे हे अपघाताला निमंत्रण देणारं ठरतं. याबाबत वेळोवेळी वाहतूक पोलिसांकडून जनजागृती केली जाते. तरीही अनेकजण याकडे दुर्लक्ष करून मद्य प्राशन करून वाहन चालवतात. यामुळे अपघात होऊन अनेकांचे बळी गेलेले आहेत. तर दारू पिऊन अपघात होण्याचे प्रमाण 31 डिसेंबरला मोठ्या प्रमाणात वाढते. हे थांबविण्यासाठी बीड जिल्हा पोलीस सरसावले असून, 31 डिसेंबर रोजी ठिकठिकाणी नाकेबंदीदरम्यान तपासणी केली जाणार आहे. जिल्ह्यात प्रत्येक पोलिस ठाण्याला यासाठी मशीन दिलेल्या आहेत. वाहतूक शाखेकडेही मशीन आहेत. सुमारे 40 मशीन असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : MHADA : ऐतिहासिक निर्णय, मास्टर लिस्टवरील पात्र अर्जदारांची आज संगणकीय सोडत

अवैध दारू विक्रीवर कारवाईचा बडगा

एप्रिल ते नोव्हेंबर या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने 616 गुन्हे नोंद करुन 596 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत 1 कोटी 24 लाख 34 हजार 634 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला आहे. आणि याच पार्श्वभूमीवर अवैध दारू विकणाऱ्या वर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाची करडी नजर असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -