घरक्राइमLalit Teckchandani Arrested : कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणी बिल्डर टेकचंदानीला अटक

Lalit Teckchandani Arrested : कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणी बिल्डर टेकचंदानीला अटक

Subscribe

मुंबई – तळोजा येथील प्रकल्पात घर देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल असलेला बांधकाम व्यावसायिक ललित टेकचंदानी याला अटक करण्यात आली आहे. टेकचंदानी याने गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडवल्याचा आरोप आहे. एका वृत्तसंस्थेने याविषयीचे वृत्त दिले आहे. घर देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप मे. सुप्रीम डेव्हलपर्स प्रा. लि. चे ललित शाम टेकचंदानी याच्यावर आहे. याचप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी चौकशीअंती कारवाई केली आहे.

हेही वाचा – Maratha Reservation Survey : मराठा समाज सर्वेक्षणाला शनिवारपर्यंत मुदतवाढ; कर्मचाऱ्यांची लगबग वाढली

- Advertisement -

चेंबूर येथील हिरा जाधवानी यांच्या तक्रारीनुसार मे. सुप्रीम डेव्हलपर्स प्रा. लि. चे ललित शाम टेकचंदानी, काजल ललित टेकचंदानी,अरूण माखीजानी, मनुल्ला मेहबुल्ला कांचवाला, मिर्झा मोहंमद नुरुल हसन इब्राहीम व इतर मे. सुप्रीम डेव्हलपर्स प्रा. लि. चे आजी-माजी संचालक, भागीदार आणि प्रमोटर्स यांनी पैसे घेऊनही घर दिले नसल्याचा आरोप केला आहे. तळोजा येथील प्रकल्पात घर देण्याच्या नावाखाली 73 लाख 60 हजार रुपये घेण्यात आहे आहेत. यामध्ये फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला.

काय आहे प्रकरण?

ललित टेकचंदानी बांधकाम व्यावसायिक आहे. मुंबईतल्या बांधकाम क्षेत्रातलं एक मोठं नाव आहे. मात्र ग्राहकांची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा आता त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी नऊ तास त्याची याच प्रकरणी चौकशी केली. त्यानंतर अटकेची कारवाई केली. कलम 420 आणि 406 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात 160 ग्राहकांची 44 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – विरोधी खासदारांचे निलंबन मागे! आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय

ललित टेकचंदानी हे कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते. टेकचंदानी यांच्याशिवाय भुजबळांचे पान हलत नव्हते अशी त्याकाळी चर्चा होती. सार्वजनिक बांधकाम विभागातील कोणताही निर्णय टेकचंदानी यांना विचारल्याशिवाय घेतला जात नसल्याचं बोललं जायचं. जोपर्यंत भुजबळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री होते, तोपर्यंत टेकचंदानीच्या परवानगीशिवाय अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि निविदाही मंजूर होणे अवघड होते. ललित टेकचंदानी आणि छगन भुजबळ यांचे दहा वर्षे उत्तम संबंध होते. 2014 मात्र या दोघांमध्ये वितुष्ट आलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -