Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Corona Third Wave: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आता बालरोग कोविड केअर वार्ड...

Corona Third Wave: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आता बालरोग कोविड केअर वार्ड उभारणार

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोना दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. त्यात आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जून-ऑगस्ट महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचे सांगितले होते. त्याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल यांची भेट घेतली आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने बालरोग कोविड केअर वार्ड उभारण्याबाबत चर्चा केली. याबाबतची माहिती आदित्य ठाकरे यांनी अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून शेअर केली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने क्षमता वाढवण्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर मी आज एएमसी संजय जयस्वाल यांना भेटलो आणि मुंबईत केलेल्या उपायांवर चर्चा केली. मी त्यांना सुचवले की, येणाऱ्या लाटेच्या शक्यतेनुसार आणि लोकसंख्याशास्त्राची पूर्वानुमान घेऊन आपण एक बालरोग कोविड केअर वार्ड तयार करू.’

- Advertisement -

पुढे आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘बालरोग कोविड केअर सेंटर सोबतच आता आपण ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत केले आहे ते म्हणजे पालकांना कोविड केअर सेंटरमध्ये राहावे लागले आणि ज्या मुलांची देखभाल करण्यासाठी कोणी नसेल अशा मुलांसाठी साखळी रुपात कोविड केअर सेंटर तयार करणे, ज्यामुळे कोविड संसर्ग होणार नाही.’


- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Corona Update: महाराष्ट्रातील ‘या’ १२ जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उतरता


 

- Advertisement -