घरमहाराष्ट्रमुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान; काळे विरुद्ध पाटील अशी रंगणार लढत

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान; काळे विरुद्ध पाटील अशी रंगणार लढत

Subscribe

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक होणार आहे. यासाठी 380 जण मतदानाचा हक्का बजावणार आहेत. या निवडणुकीनिमित्त महाराष्ट्रातील राजकारणी एकाच मंचावर आले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांच पॅनल एकत्र निवडणूक लढवणार आहे. शरद पवार आणि आशिष शेलार पॅनलचे अमोल काळेविरुद्ध माजी कसोटीवीर संदिप पाटील यांचा ही थेट लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि शिवसेना वाहतूक संघटनेचे निलेश भोसले हेही पवार- शेलार पॅनलकडून कार्यकारिणीसाठी निवडणुकीच्या रिंगणार आहेत. आज दुपारी 3 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) अर्थात पूर्वीची बॉम्बे क्रिकेट असोसिएशन. ही मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या परिसराची क्रिकेटची प्रशासकीय संस्था आहे. पश्चिम उपनगरातील डहाणू, मध्य उपनगरातील बदलापूर, खारघर आणि नवी मुंबईचा एमसीएच्या कार्यक्षेत्रात समावेश होतो.

- Advertisement -

MCA च्या निवडणुकीनिमित्त एकमेकांविरोधात आरोप प्रत्योरोप करणारे राजकीय विरोधक काल एकाचं व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. वानखेडे स्टेडियमवर आयोजित स्नेहभोजणाच्या कार्यक्रमानिमित्त राज्याचे मुख्यंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार एकत्र आले होते. राज्यातील राजकीय सत्तांतरानंतर पहिल्यांदाच हे सर्वजण एकाच व्यासपीठावर आल्याने राजकीय चर्चांना आता उधाण आले आहे.


एमसीए निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे, पवार आणि फडणवीस एकाच मंचावर; चर्चांना उधाण

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -