घरदिवाळी 2022दिवाळी सण मोठा, नाही 'आतषबाजीला' तोटा; खिशाला चटके देत फटाक्यांची खरेदी जोरात

दिवाळी सण मोठा, नाही ‘आतषबाजीला’ तोटा; खिशाला चटके देत फटाक्यांची खरेदी जोरात

Subscribe

दोन वर्षांच्या लॉकडाऊननंतर यंदा निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होत आहे. निर्बंधमुक्त दिवाळीमध्ये महागाईच्या झळा लागत असल्या तरीही फटाक्यांची खरेदी जोरात सुरू आहे. रस्त्यांवर फटाके विक्रीला मनाई असल्याने फटाक्यांच्या अधिकृत दुकानांमध्ये खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. 

मुंबई : आसमंत उजळून टाकणाऱ्या दिवाळीत यंदा आतषबाजीलाही जोर येणार आहे. कारण दोन वर्षांच्या खंडानंतर फटाक्यांच्या खरेदी-विक्रीलाही प्रतिसाद चांगला मिळत आहे. यावर्षी फटाक्यांच्या किमतीत ४० ते ६० टक्क्यांची वाढ झाली असली तरीही दिवाळीसाठी लोकांचा उत्साह कमी झालेला नाही. त्यामुळे बाजारात फटक्यांच्या खरेदीसाठी झुंबड उडाली आहे.

दोन वर्षांच्या लॉकडाऊननंतर यंदा निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होत आहे. निर्बंधमुक्त दिवाळीमध्ये महागाईच्या झळा लागत असल्या तरीही फटाक्यांची खरेदी जोरात सुरू आहे. रस्त्यांवर फटाके विक्रीला मनाई असल्याने फटाक्यांच्या अधिकृत दुकानांमध्ये खरेदीसाठी झुंबड उडाली आहे.

- Advertisement -

किमती का वाढल्या?

सर्वोच्च न्यायालयाने बेरियम नायट्रेटच्या वापरावर निर्बंध घातल्याने उत्पादन ४० टक्क्यांनी घटले आहे. तर, फटाके बनवण्यासाठी बेरियम नायट्रेटबरोबरच अमोनियम नायट्रेट, अॅल्युमिनियम पावडर, कॉपर कोटेड वायर, सल्फर, रद्दी पेपर, सुतळी अशा कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली आहे. परिणामी फटाक्यांच्या किमती ४० ते ६० टक्क्यांनी महागल्या आहेत. कामगारांची मजुरी, इंधन दरात वाढ यांचीही भर त्यात पडली आहे.

- Advertisement -

मुंबईतील फटाका बाजार गजबजले

दादर, लालबागमध्ये फटाक्यांची मोठ्याप्रमाणात विक्री होते. तर, पश्चिम मार्गावरील माहिम, वांद्रे, अंधेरी, मालाड येथेही फटाक्यांची विक्री जोरात सुरू आहे. शिवाय, ठिकठिकाणी स्थानिक लोकांकडून फटाक्यांचे स्टॉल्स लावले जातात.

उल्हासनगरात होलसेल विक्रीला प्रतिसाद

ठाण्यासह आजूबाजूच्या परिसरात लहान-मोठ्या दुकानांमध्ये उल्हासनगरमधून होलसेल दरात फटाके आणले जातात. महत्त्वाचं म्हणजे, उल्हासनगरातील अनेक फटाक्यांच्या दुकानांत कमी किंवा अधिक प्रमाणात फटाके खरेदी केले तरी होलसेल भावातच ते विकले जातात. त्यामुळे रिटेल व्यावसायिकांसह अनेक खरेदीदार उल्हासनगरातून खरेदी करतात.

यंदा नवीन काय?

सुरसुरी, भुईचक्र, पाऊस, आपटी बॉम्ब, रॉकेट या पारंपरिक फटाक्यांसह बाजारात अनेक नवे फटाके आले आहेत. आकाशात उडणाऱ्या ‘शॉट्स फटाक्या’त विविध प्रकार आल्याचे उल्हासनगरमधील फटाक्यांचा व्यापार करणारे उमेश नानिक्रम वाधरिया यांनी सांगितलं. ते म्हणाले की, दरवर्षी बाजारात नवनवे प्रकारचे फटाके येत असतात. यंदा आकाशात उडणाऱ्या फटाक्यांमध्ये नवनवे प्रकार आले आहेत. उंच आकाशात दीर्घकाळ प्रकाशमान राहणारे फटाके यंदाचे आकर्षण आहेत. लांबून हे फटाके दृष्टीस पडतील. तसंच, आवाज न करणारे, फक्त प्रकाशित होणारेही फटाके बाजारात आले आहेत. बंदुकीच्या आकारात असलेल्या फटाक्याच्या वातीला जाळल्यास त्यातून रंगीत प्रकाश बाहेर पडतो. हा प्रकारसुद्धा लहान मुलांच्या पसंतीस पडत आहे.

शिवकाशीत उत्पादन घटले

देशभरातील ९० टक्के फटाक्यांचे उत्पादन तामिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यातील शिवकाशीत होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्बंधांनंतर येथील उत्पादन घटले आहे. त्यामुळे मजुरांची संख्याही कमी झाली आहे. येथील ६.५ लाख कुटुंबाचा उदरनिर्वाह येथील फटाक्यांवर अवलंबून आहे. मात्र, बेरिअमवरील निर्बंधामुळे दीड लाखांहून अधिक लोक बेरोजगार झाले आहेत.

असे आहेत दर

  • सुरसुरी – १० ते १०००
  • आपटी बार – ५ ते ५०० रुपये
  • भुईचक्र – ५० ते ५०० रुपये
  • लक्ष्मी बॉम्ब – ३० रुपये पॅकेट
  • रॉकेट – ५० ते ५०० रुपये
  • फॅन्सी फटाके – ५० ते ४०० हजार
  • लवंगी फटाके १०० ते २०० रुपये बॉक्स
Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -