घरमहाराष्ट्रभाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; विखे-शिंदे बैठकीत समोरासमोर

भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; विखे-शिंदे बैठकीत समोरासमोर

Subscribe

भाजप पक्षातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. काही महिन्यांपूर्वी अशाप्रकारची गटबाजी खान्देशात बघायला मिळाली होती. त्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्यात अशाप्रकारची गटबाजी बघायला मिळत आहे. यावेळी समोर येणारा वाद हा भाजपचे जुने नेते आणि पक्षांतर करुन पक्षात आलेले नवे नेते यांच्यात बघायला मिळत आहे. मात्र, या घडामोडींमुळे नगरचे राजकारण ढवळून निघाले आहे. दरम्यान, या प्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राम शिंदे समोरासमोर होते.

काय आहे प्रकरण?

लोकसभा निवडणुकीच्या काळात सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आणि भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. या निवडणुकीत सुजय यांचा विजय झाला होता. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील भाजपने विधानसभा निवडणुकीच्या वेळी मंत्रीपदाचे आश्वासन दिले असल्याची माहिती आता समोर येत आहे. याच आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर भाजपात प्रवेश केला आणि भाजपच्या तिकिटावर जिंकूनही आले. मात्र, या निवडणुकीत भाजप पूर्णपणे खाली कोसळली. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात भाजपचे ५ उमेदवार निवडून आले होते. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत विखे पाटील पकडून फक्त तीन उमेदवार जिंकून आले.

- Advertisement -

विखे पाटील यांच्यासोबत वैभव पिचड यांनी देखील भाजपात प्रवेश केला होता. मात्र, वैभव पिचड यांचा या निवडणुकीत पराभव झाला. याच गोष्टीचा धागा पकडत भाजपचे नेते राम शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत विधानसभा निवडणुकीत विखे फॅक्टरचा काहीही उपयोग झाला नसल्याचे ते म्हणाले. याशिवाय पिचड आणि विखे आल्यामुळे पक्षाच्या आमदारांची संख्या सात व्हायला हवी होती, असेही ते म्हणाले. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या वेळी या दोघांच्या पक्षांतरानंतर जिल्ह्यात अनेक अडचणी आल्या असल्याचे ते म्हणाले. या संदर्भात आपण प्रदेश प्रतिनिधींकडे तक्रार देखील केली असल्याची माहिती शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती.

दरम्यान, ‘विखे आणि त्यांच्या चुकींमुळे नगर जिल्ह्यात भाजपचा पराभव झाला’, असा आरोप माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी केला होता. त्यामुळे नगर जिल्ह्यात विखे पिता-पुत्र विरुद्ध भाजपचे नेते असा वाद शिगेला पोहोचल्याचे बघायला मिळाले. अखेर याच प्रकरणावरुन आज मुंबईत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.  या बैठकीला माजी मंत्री रम शिंदे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार वैभव पिचड, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे आणि जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड उपस्थित होते.

- Advertisement -

या बैठकीनंतर राधाकृष्ण विखे पाटील आणि राम शिंदे दोन्ही नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ‘आपल्या विषयी नाराजी होती तर पक्षश्रेष्ठींकडे मांडायला हवी होती, मीडियासमोर नाही’, असा टोला विखे यांनी शिंदेंना लगावला. तर ‘पक्षाने दोन्ही बाजू एकूण घेतल्या असून पक्षनिर्णयाने आम्ही समाधानी आहोत’, असे राम शिंदे म्हणाले. याशिवाय ‘आम्ही आमच्या व्यथा पक्षश्रेष्ठींकडे मांडल्या’, असे देखील राम शिंदे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -