घरताज्या घडामोडीMaharashtra Assembly Budget Session 2022 : लोककलावंतांच्या मानधनात वाढ करणार; अमित देशमुख...

Maharashtra Assembly Budget Session 2022 : लोककलावंतांच्या मानधनात वाढ करणार; अमित देशमुख यांचे आश्वासन

Subscribe

राज्यातील लोककलावंत, भजनी बुवा यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत विधिमंडळाच्या पुढील अधिवेशनापूर्वी निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी मंगळवारी विधानसभेत दिले. शिवसेनेचे सुनील प्रभू, वैभव नाईक, राजन साळवी, भरतशेठ गोगावले यांनी लोककलावंत, भजनीबुवा आणि वृद्ध कलावंत यांच्या मानधनाबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या लक्षवेधीवरील चर्चेला उत्तर देताना देशमुख यांनी लोककलावंतांचे मानधन वाढविण्याबाबत एक समिती नेमण्यात येईल. तसेच लोककलावंताच्या मानधनाबाबत पुनर्रचना करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

खेळाडूप्रमाणे सरकारी नोकऱ्यांमध्ये लोककलावंताना प्राधान्य मिळावे ही सूचना उत्तम आहे. विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत या सूचनेचा विचार करू, असेही अमित देशमुख यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

तत्पूर्वी तमाशा, खडीगंमत, वासुदेव, पोतराज, चित्रकथी, बहुरूपी, कीर्तनकार, प्रबोधनकार, वारकरी सांप्रदायातील यासह लोककलाकारांना दरमहा मानधन दिले जाते. मात्र कोरोना महामारीमुळे सांस्कृतिक कार्यक्रम न झाल्याने या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली. प्रचंड महागाईमुळे त्यांना उदरनिर्वाह करणेही कठीण झाले असून या कलाकारांना मिळणार्‍या मानधनात वाढ करण्यात यावी. त्याचप्रमाणे मुंबईसह कोकणातील भजनमंडळांची नोंद घेऊन त्यांनाही आर्थिक सहकार्य मिळावे, अशी मागणी शिवसेना आमदारांनी केली. तर आपल्या मागण्यासाठी मुंबईत आंदोलन करणाऱ्या लोककलावंतावर गुन्हे दाखल झाले असून ते मागे घ्यावेत, अशी मागणी भाजपच्या आशिष शेलार यांनी केली.

लोककलावंताना सध्या मिळत असलेले मानधन…

राष्ट्रीय लोककलावंत : ३ हजार ५० रुपये
राज्यस्तरीय लोककलावंत : २ हजार ७०० रुपये
स्थानिक लोककलावंत : २ हजार २५० रुपये

- Advertisement -

हेही वाचा – आगामी आर्थिक वर्ष उपजीविका वर्ष म्हणून साजरे करणार, हसन मुश्रीफ यांची माहिती


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -