घरताज्या घडामोडीआगामी आर्थिक वर्ष उपजीविका वर्ष म्हणून साजरे करणार, हसन मुश्रीफ यांची माहिती

आगामी आर्थिक वर्ष उपजीविका वर्ष म्हणून साजरे करणार, हसन मुश्रीफ यांची माहिती

Subscribe

महिलांना गरीबीतून बाहेर काढण्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून बांधणी करून त्यांच्या सक्षमीकरणाचे काम शासनाने हाती घेतले आहे. आता आगामी सन २०२२ -२०२३ हे आर्थिक वर्ष हे उपजीविका वर्ष म्हणून साजरे करणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ दिली आहे.

ग्रामविकास आणि पंचायतराज विभागाच्या उमेद अभियानमार्फत ‘महाजीविका अभियान’ राज्यस्तरीय शुभारंभ हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. हसन मुश्रीफ यांनी यावेळी राज्यातील सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन २०२२ – २३ हे वर्ष उपजीविका वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामध्ये उपजीविका आणि विपणन या विषयावर भर देण्यासाठी महाजीविका अभियानाचा शुभारंभ झाला असे मुश्रीफ म्हणाले आहेत.

- Advertisement -

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आज महिला आरक्षण असल्याने त्यांची प्रगती दिसून येते. महिलांचा सर्व क्षेत्रात सहभाग वाढविल्यास आपला देश महासत्ता होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामामुळेच महिला चूल आणि मुलांसह पुरूषांच्या खांद्याला खांदा लाऊन कार्य करत आहेत. ग्रामविकासामध्ये महिलांचा विकास हा महत्त्वाचा विषय असून यासाठी महिलांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीयदृष्ट्या सक्षम करण्याची गरज असल्याचे मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील जवळपास ५६ लाख कुटुंबे या अभियानात सहभागी असून सुमारे ५ लाख ४७ हजार स्वयंसहाय्यता गटांची निर्मिती करण्यात आली आहे. या स्वयंसहाय्यता गटांना आतापर्यंत १२ हजार ४७९ कोटी रूपयांची बॅंक कर्जे आणि अभियानामार्फत ९५३ कोटी रूपयांचा समुदाय निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोविड काळात उमेद अभियानातील महिलांनी पुढाकार घेऊन मास्क निर्मितीच्या विक्रीतून ११.२५ कोटी रूपयांची आर्थिक उलाढाल केली आहे. प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत १५ कोटी रूपयांचे बीजभांडवल वितरीत केले असून लवकरच १३ कोटी रूपयांचे वितरण करण्यात येणार आहे.

- Advertisement -

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत चार उपप्रकल्प मंजूर असून त्याची किंमत ४.१५ कोटी रूपये आहे. याशिवाय २०० उपप्रकल्पाचे उद्दिष्ट असून ३०० महिला शेतकरी उत्पादक कंपन्या निर्मितीचे उदिष्ट आहे. आता या महाजीविका अभियानातून महिलांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देऊन राज्यातील किमान दहा लाख महिलांना उपजीविका साधने उपलब्ध करून देण्याचे प्राथमिक उद्दिष्ट या अभियानात नक्की केले आहे. अभियान रचनेत काही त्रुटी असल्यास त्या दूर करून सर्व बचत गटांच्या महिलांचे जीवन सुखी आणि संपन्न करूया असा निर्धार मुश्रीफ यांनी केला आहे.


हेही वाचा : मविआचा महाकत्तलखाना : महाजनांवर मोक्का लावण्यासाठी ठाकरे सरकारचे षडयंत्र, फडणवीसांनी सांगितला घटनाक्रम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -