घरमहाराष्ट्रऐतिहासिक कर्जमाफी महसूल तुटीला कारणीभूत - अतुल भातखळकर

ऐतिहासिक कर्जमाफी महसूल तुटीला कारणीभूत – अतुल भातखळकर

Subscribe

राज्यात पहिल्यांदाचा १७ हजार कोटींची ऐतिहासिक कर्जमाफी केल्याचा धिंडोरा पिटणाऱ्या भाजपाचे आमदार मागील वर्षी केलेल्या ऐतिहासिक कर्जमाफी राज्याच्या महसूल तुटीला कारणीभूत असल्याचे सांगत आहे. या विषयावरून आता सरकार आणि विरोधकांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रियी येण्यास सुरूवात झाली आहे.

राज्यात पहिल्यांदाचा १७ हजार कोटींची ऐतिहासिक कर्जमाफी केल्याचा धिंडोरा पिटणाऱ्या भाजपाचे आमदार मागील वर्षी केलेल्या ऐतिहासिक कर्जमाफी राज्याच्या महसूल तुटीला कारणीभूत असल्याचे सांगत आहे. यामुळे आता विरोधक देखील आक्रमक झाले असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय वित्त आयोग सध्या मुंबईच्या दौऱ्यावर असून, या आयोगाने मंगळवारी राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधला. त्यावेळी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ऐतिहासिक कर्जमाफीचा दाखला देत वित्त आयोगाच्या निष्कर्षावर आक्षेप घेतला आहे.

काय म्हणाले नेमके भायखळकर

आयोगाने काढलेले निष्कर्ष चुकीच्या तथ्यावर आधारित असल्याने यूपीएच्या काळात म्हणजेच २००५-०७ मध्ये राज्याचा जीडीपी आणि कर्जाचे प्रमाण २५ टक्के होते. रिझर्व्ह बॅंकेच्या निकषांच्या (२२ टक्के) तुलनेतही हे प्रमाण खूप जास्त होते. मात्र आता हे प्रमाण १६ टक्क्यांवर आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गेल्या वित्तीय वर्षात शेतक-यांना दिलेली १७ हजार कोटीं रुपयांची ऐतिहासिक कर्जमाफी महसूली तुटीला कारणीभूत होती, असे देखील त्यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

सरकार गोंधळलं आहे

दरम्यान अतुल भातखळकर यांच्या या विधानानंतर आता विरोधक देखील आक्रमक झाले असून, हे गोंधळलेले सरकार आहे. त्यामुळे आता अशी वक्तव्य होत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी दिली. तसेच राज्याची आर्थिक स्थिती पूर्णपणे ढासळली आहे. त्यामुळे आता त्यांचे प्रतिनिधी आता सारवासारव करत असल्याचा आरोप करत हे ढोंगी सरकार असल्याचे त्यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले. एकंतर कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -