घरक्राइमSomalian Pirates : भारतीय नौदलाने जेरबंद केलेले 35 सोमालियन चाचे मुंबई पोलिसांच्या...

Somalian Pirates : भारतीय नौदलाने जेरबंद केलेले 35 सोमालियन चाचे मुंबई पोलिसांच्या ताब्यात

Subscribe

मागील आठवड्यात भारतीय नौदलाने ताब्यात घेतलेले 35 सोमालियन चाच्यांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. शनिवारी मुंबई पोलिसांनी या चाच्यांना आपल्या ताब्यात घेतले.

मुंबई : जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात भारतीय नौदलाने अरबी समुद्रातील चाचेगिरी मोडून काढण्याचा संकल्प हाती घेतलेला आहे. त्यानुसार नौदलाने हिंदी महासागर आणि अरबी समुद्रात आपलं वर्चस्व दाखवून देत तब्बल 35 सोमालियन चाच्यांना जेरबंद केले. या सोमालियन चाच्यांकडून समुद्रातील व्यापारी जहाजांना लक्ष करून ते लुटले जात होते. परंतु, 15 मार्चला भारतीय नौदलाने ‘ऑपरेशन संकल्प’च्या माध्यमातून कारवाई करत या समुद्री चाच्यांशी दोन हात करत त्यांना जेरबंद केले. त्यानंतर या चाच्यांना काल शनिवारी (ता. 23 मार्च) मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. (35 Somali pirates arrested by the Indian Navy are in the custody of Mumbai Police)

हेही वाचा… Mumbai Building Fire : वडाळा येथील टॉवरला आग; जीवितहानी नाही, मात्र रहिवाशांचे रात्रभर हाल

- Advertisement -

भारतीय नौदलाने काही दिवसांपूर्वी भरसमुद्रात समुद्री चाच्यांशी 40 तास कडवी झुंज दिली. या कारवाईत नौदलाच्या आयएनएस कोलकाता आणि आयएनएस सुभद्रा युद्धनौका, ड्रोन आणि सागरी कमांडो सहभागी झाले होते. या समुद्र लुटारुंच्या शोध मोहिमेअंतर्गत नौदलाने भारतीय किनाऱ्यापासून 2600 किलोमीटर दूर असलेल्या या लुटारुंवर कारवाई करुन त्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले होते. 40 तास भरसमुद्रात चाललेल्या कारवाईत लुटारुंनी भारतीय जवानांवर अनेकवेळा गोळीबारही केला. नौदलाच्या माहितीनुसार, “या महत्त्वपूर्ण बचाव मोहिमेचा एक भाग म्हणून, भारतीय युद्धनौका आयएनएस कोलकातावरील 35 समुद्री लुटारुंना ताब्यात घेण्यात आले. तसंच या व्यापारी जहाजातील 17 क्रू मेंबर्सचीही सुखरुप सुटका करण्यात आली.

या कारवाईनंतर जहाजावरील सर्व सोमालियन चाच्यांना ताब्यात घेण्यात आले. या सर्व चाच्यांना घेऊन आयएनएस कोलकाता जहाज शनिवारी मुंबईच्या किनाऱ्यावर आले. या 35 सोमालियन चाच्यांविरोधात आयपीसी कलम 307, 364(A), 363, 384, 353, 341, 342, 344, (A) 120 (B), 143, 145, 147, 148, 149, 438, 427, 506 अंतर्गत मुंबईतील येलो गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. तर, या प्रकरणात 2 पांढऱ्या बोटी, 3 इंजिन, 9 मोबाईल फोन, 196 जिवंत काडतुसे, 1 डाऊन केस, 1 चाकू, 1 सोनी कॅमेरा, 1 सोमाली देशाचा पासपोर्ट, 2 बल्गेरिया पासपोर्ट, ओळखपत्रासह इतर कागदपत्रे जप्त करण्यात आल असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -