घरमहाराष्ट्र‘स्वराज्यभूमी’ गिरगाव चौपाटी येथील ‘दर्शक गॅलरी’चे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण

‘स्वराज्यभूमी’ गिरगाव चौपाटी येथील ‘दर्शक गॅलरी’चे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण

Subscribe

मुंबईत पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबई महापालिकेने सर्व प्रकारच्या परवानग्या घेऊन 'स्वराज्यभूमी' अर्थात 'गिरगाव चौपाटी'लगत नव्याने उभारण्यात आलेल्या 'दर्शक गॅलरी'चे लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी करण्यात आले.

मुंबई -: महाराष्ट्राचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून गिरगाव चौपाटी येथे साकारण्यात आलेल्या ‘दर्शक गॅलरी’चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी उद्धव ठाकरे, खा. अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, आ. मंगल प्रभात लोढा, महापालिका आयुक्त इक्बाल चहल, अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार, ‘डी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड, पालिकेचे संबंधित अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंबईत पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबई महापालिकेने सर्व प्रकारच्या परवानग्या घेऊन ‘स्वराज्यभूमी’ अर्थात ‘गिरगाव चौपाटी’लगत नव्याने उभारण्यात आलेल्या ‘दर्शक गॅलरी’चे लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी करण्यात आले. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या या ‘दर्शक गॅलरी’चे भूमिपूजन गेल्यावर्षी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या ८ महिन्यांच्या विक्रमी कालावधीत हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊन त्याचे लोकार्पण करण्यात आले.

- Advertisement -

गिरगाव चौपाटी येथील ‘दर्शक गॅलरी’बाबत माहिती

>> स्वराज्यभूमी गिरगाव चौपाटीच्या उत्तर टोकाला व नेताजी सुभाष मार्ग व कविवर्य भा. रा. तांबे चौकालगत पावसाचे पाणी समुद्रात वाहून नेणाऱ्या महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनीच्या पातमुखावरती ४८३ चौरस मीटर आकाराची दर्शक गॅलरी उभारण्याचे काम ३ सप्टेंबर २०२१ पासून सुरू करण्यात आले होते.

>> या प्रकल्पांतर्गत समुद्राचे, चौपाटीचे आणि ‘क्विन्स नेकलेस’ अशी ओळख असणा-या नेताजी सुभाष मार्गाचे विलोभनीय, विहंगम व मनमोहक दर्शन घडविणा-या या गॅलरीची उभारणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

>> भरती–ओहोटी, समुद्राच्या लाटांची उंची व दाब आदी सर्व बाबींचा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करून त्या अनुरुप ही गॅलरी उभारण्यात आली आहे.

>> ही गॅलरी उभारण्यासाठी सर्व संबंधित परवानग्या अगोदरच घेण्यात आल्या होत्या. फक्त ८ महिन्यात ही गॅलरी आकारास आली आहे.

>> ‘दर्शक गॅलरी’ अर्थात सदर ‘व्ह्युईंग डेक’वर एकाच वेळेस किमान ५०० पर्यटकांना सागरी सौंदर्य न्याहाळता येणार आहे.

>> ‘नेताजी सुभाष मार्ग’ अर्थात राणीच्या रत्नहाराप्रमाणे दिसणा-या ‘मरिन ड्राईव्ह’चे
विहंगम दृश्य हे डोळ्याचे पारणे फेडणारे असणार आहे.

>> गॅलरीच्या ठिकाणी विश्रांतीसाठी कल्पकतेने आसने मांडण्यात आली आहेत.

>> या गॅलरीच्या ठिकाणी फुल झाडांची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे.

>> सदर ‘व्ह्युविंग डेक’च्या परिरक्षणाचे काम हे महापालिकेतर्फेच करण्यात येणार आहे.


हेही वाचाः अंधभक्तांचा हल्ली सुळसुळाट, उद्धव ठाकरेंचा नेमका टोला कोणाला?

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -