घरक्रीडासलग चौथ्या विजयासह हैदराबाद चौथ्या स्थानावर; उम्रान मलिक सामनावीर

सलग चौथ्या विजयासह हैदराबाद चौथ्या स्थानावर; उम्रान मलिक सामनावीर

Subscribe

श्रीनगरच्या २२ वर्षीय उम्रान मलिकने रविवारी नेरुळच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर हजेरी लावणाऱ्या २० हजार प्रेक्षकची मने जिंकली. त्याने डावातील अखेरचे षटक तर निर्धाव टाकताना ३ मोहरे टिपले आणि पंजाबचा डाव १५१ धावतच संपुष्टात आणला.

– शरद कद्रेकर

नवी मुंबई : मक्रम आणि पुरण या चौथ्या जोडीने पाऊणशे धावांची नाबाद भागीदारी केल्यामुळे सनरायझर हैदराबादने पंजाब किंगजवर ७ विकेट्स आणि ७ चेंडू राखून विजय मिळवला आणि आयपीएलमध्ये चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. हैदराबादचा हा सलग चौथा विजय आहे. २२ वर्षीय काश्मिरी तेज गोलंदाज उमरान मलिक (२८ धावांत ४ विकेट्स) सामनावीर ठरला आणि ती निवड सार्थच म्हणायला हवी.

- Advertisement -

श्रीनगरच्या २२ वर्षीय उम्रान मलिकने रविवारी नेरुळच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर हजेरी लावणाऱ्या २० हजार प्रेक्षकची मने जिंकली. त्याने डावातील अखेरचे षटक तर निर्धाव टाकताना ३ मोहरे टिपले आणि पंजाबचा डाव १५१ धावतच संपुष्टात आणला. ४-१-२८-४ हे त्याचं गोलंदाजीचे पृथ:करण पुरेसे बोलके आहे. त्याची ही आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी आहे.

भुवनेश्वर कुमार आणि नटराजन यांनी सुरुवातीलाच पंजाबच्या डावाला खिंडार पाडले. ४ बाद ६१ वरून त्यांचा डाव सावरला तो लिआम लिव्हिंग स्टोन आणि शाहरुख खान या पाचव्या जोडीने केली. या दोघांनी ७१ धावांची भागीदारी केल्यामुळे पंजाबने सव्वाशेचा टप्पा पार केला.

- Advertisement -

दीडशेची मजल त्यांनी मारली, पण उमरानच्या भन्नाट वेगवान गोलंदाजीपुढे त्यांच्या शेपटाचा निभाव लागला नाही. ओडन स्मिथला त्याने स्वत:च झेलबाद केले तर राहुल चहर आणि वैभव अरोरा याच्या स्टम्प त्याने उखडून टाकल्या. अशात काश्मीरमधील या २२ वर्षांचं युवकाचे नाव आता सर्वोमुखी झालं आहे, असं म्हणता येईल. १५० च्या वेगाने गोलंदाजी करणाऱ्या उमरानने आपली छाप पाडली आहे.

दक्षिण आफ्रिकन मक्रम आणि वेस्ट इंडियन निकलस पुरन यांनी पंजाबच्या आक्रमणाला दाद न देता झटपट ७५ धावांची भर घातली. मकरमचया षटकारने हैदराबादच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने २७ चेंडूत ४१ धावा केल्या त्या ४ चौकार आणि एका षटकारनिशी निकलस पुरनने एक चौकार आणि एक षटकारनिशी नाबाद ३५ धावा केल्या. या विजयासह हैदराबाद चौथ्या स्थानावर तर पंजाबची सातव्या क्रमांकावर घसरण झाली.


हेही वाचाः IPL-BCCI Payment Rules : दीपक चहरला मिळणार का १४ कोटींच्या लिलावाची रक्कम ? जाणून घ्या बीसीसीआयचा खास नियम

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -