घरमहाराष्ट्रऔरंगाबाद महापालिकेची निवडणूक सहा महिने पुढे ढकलण्याची मागणी

औरंगाबाद महापालिकेची निवडणूक सहा महिने पुढे ढकलण्याची मागणी

Subscribe

महाराष्ट्रातही करोना व्हायरसचा शिरकाव झाल्याने त्याचा सर्वांनीच धसका घेतला आहे. औरंगाबादच्या महापौरांनी तर औरंगाबाद महापालिकेची निवडणूक सहा महिने पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. महापौर नंदकुमार घोडले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ही मागणी केली आहे.

करोना व्हायरसची भीती लक्षात घेता महापालिकेची निवडणूक सहा महिने पुढे ढकलण्यात यावी. ही निवडणूक पुढे ढकलताना पालिकेवर प्रशासक नेमू नये. विद्यमान नगरसेवकांनाच सहा महिन्यांची मुदतवाढ देऊन निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी महापौर नंदकुमार घोडले यांनी केली आहे.

- Advertisement -

नाशिक आणि पुणे येथे करोना व्हायरसचे रुग्ण सापडले आहेत. या दोन्ही शहरापासून औरंगाबाद जवळ आहे. औरंगाबाद ही पर्यटनाची राजधानी आहे. त्यामुळे देश-विदेशातील पर्यटक औरंगाबादमध्ये येत असतात. जगभरातील पन्नासहून अधिक देशातील नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. औरंगाबादमध्ये या देशातूनही पर्यटक येण्याची शक्यता आहे. महापालिका करोनाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे. मात्र करोनामुळे भीतीचं वातावरण असल्याने एप्रिल महिन्यात होणारी पालिकेची निवडणूक सहा महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी घोडले यांनी केली आहे. घोडले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि निवडणूक आयोगाकडेही ही मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -