घरमहाराष्ट्रकाँग्रेस नगरसेवकाला ३ कोटींच्या जुन्या नोटांसह अटक

काँग्रेस नगरसेवकाला ३ कोटींच्या जुन्या नोटांसह अटक

Subscribe

पुण्यामध्ये ३ कोटी रुपयांच्या ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहे. गुरुवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली असून याप्रकरणी काँग्रेस नगरसेवकासह ५ जणांना अटक केली आहे. या सर्व आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

पुण्यामध्ये ३ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी एका नगरसेवकासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. रविवार पेठ परिसरामध्ये काल रात्री पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आज या सर्व आरोपींना शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे.

- Advertisement -

काँग्रेस नगरसेवकासह ५ जणांना अटक

तीन कोटी रुपयांच्या ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या ५ जणांना पुणे पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरचे काँग्रेस नगरसेवक गजेंद्र अभंग यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी रात्री उशीरा रविवार पेठेतील बंदिवान मारुती मंदिराजवळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

गस्तीदरम्यान पोलिसांनी केली कारवाई

काँग्रेस नगसेवक गजेंद्र अभंग, विजय शिंदे, सुरज जगताप, आदित्य चव्हाण आणि नवनाथ भांडागाळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. जुन्या नोटा बदलण्यासाठी ते पुण्यातील रविवार पेठेत असणाऱ्या बंदिवान मारुती मंदिराजवळ आले होते. याठिकाणी गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याची तपासणी केली असता त्यांच्याकडे असणाऱ्या बॅगमध्ये जुन्या नोटा सापडल्या. यामध्ये १००० रुपयांच्या ११ हजार ९०० नोटा आणि ५०० रुपयांच्या ३६ हजार नोटा आढळून आल्या.

- Advertisement -

आज कोर्टात हजर केले जाणार

याप्रकरणी खडक पोलिसांनी ५ ही आरोपींना अटक केली आहे. एका एजंटच्यामार्फत त्यांना जुन्या नोटा बदलून मिळणार होत्या. त्यासाठी ते पुण्यात आले असल्याचे चौकशी दरम्यान आरोपींनी पोलिसांना सांगितले. याप्रकरणी पाचही आरोपींची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. आज त्यांना शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -