घरताज्या घडामोडीफडणवीस मुख्यमंत्री ठाकरेंना का म्हणाले थिल्लरबाज? आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये बांधावर जुंपली

फडणवीस मुख्यमंत्री ठाकरेंना का म्हणाले थिल्लरबाज? आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये बांधावर जुंपली

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांचे बांधावर पोहोचले आहेत. या बांधांवरुनच आता दोघांमध्ये वाग्युद्ध रंगलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कोणतंही संकट आलं की सगळी जबाबदारी केंद्रावर ढकलायची आणि आपण नामानिराळं व्हायचं हे ठाकरे सरकारचं धोरण योग्य नाही, अशी टीका केली होती. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेलक्या शब्दांत फडणवीसांना टोला लगावला. यावर फडणवीसांनी पलटवार करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी थिल्लरबाजी करु नये, असं म्हटलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईवरुन आता आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये बांधावर जुंपली आहे.

केंद्राची मदत आम्ही तुम्हाला देऊ असं मला खुद्द पंतप्रधान मोदींनी सांगितलं आहे. हा कोणत्याही पक्षीय राजकारणाचा भाग नाही. केंद्राची मदत मागितली तर त्यात गैर काय आहे? मोदी सरकार हे देशाचं सरकार आहे परदेशातलं सरकार नाही. राज्यांना मदत करणं हे केंद्राची जबाबदारी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जावं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीही घराबाहेर पडतील. सध्या ते बिहारला जात आहेतच तसं त्यांनी दिल्लीतही जावं म्हणजे मोदीही घराबाहेर पडतील, अशा शब्दात फडणवीसांवर निशाणा साधला.

- Advertisement -

यावर प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना थिल्लरबाजी करु नये, असा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवेदनशील परिस्थितीत अतिशय थिल्लरपणा करत आहेत. पंतप्रधान मोदी देशावर संकट आलं तेव्हा थेट लडाखलाही गेले होते. त्यांच्याशी स्वतः ची तुलना करु नका. आज थोडा वेळासाठी बाहेर पडलात, काही तासांचा प्रवास केलात ही मोठी गोष्ट आहे. राज्य सरकार काय मदत करतं ते महत्वाचं आहे मुख्यमंत्र्यांनी त्याची घोषणा करावी. केंद्र सरकार मदत करेल. मात्र राज्य संकटात असताना आणि संकटं जाणून घेत असताना अशा प्रकारचं थिल्लर वक्तव्य करणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही, असं प्रत्युत्तर दिलं आहे. शिवाय, इतक्या दिवसांतून आज दोन-तीन तासांसाठी बाहेर आला आहात तर लगेचच स्वतःची तुलना मोदी साहेबांशी करू नका, असा टोला देखील लगावला आहे.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी फडणवीस सामवारी माढा आणि करमाळा दौऱ्यावर होते. तिथे नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानांकडे फडणवीसांचे लक्ष वेधले असता फडणवीस यांनी त्याला उत्तर दिले. केंद्र सरकारने नेहमीच महाराष्ट्राला मदत केली आहे. आता लोकांना तातडीने मदतीची गरज आहे अशावेळी केंद्राकडे मदतीसाठी बोट दाखवण्याऐवजी हिम्मत असेल राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, असं आव्हान फडणवीस यांनी दिलं.

- Advertisement -

हेही वाचा – केंद्र सरकार हे परदेशातलं सरकार नव्हे; राज्यांना मदत करणं ही केंद्राची जबाबदारी – मुख्यमंत्री


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -