ठाकरे सरकारविरोधात आमच्यासह तुम्हीसुद्धा लढा, देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंना सल्ला

ठाकरे सरकारविरोधात आमच्यासह तुम्हीसुद्धा लढा, देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंना सल्ला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहून इशारा दिला आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असे राज ठाकरेंनी राज्य सरकारला म्हटलं आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई, तडीपार केले जात असल्यामुळे राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे. तर आम्ही लढतो आहे. तुम्हीसुद्धा या ठाकरे सरकारविरोधात लढा असा सल्ला आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. महाराष्ट्रातील ठाकरे सरकारकडून दुसऱ्या अपेक्षा ठेवणं चुकीचे आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंच्या पत्राबाबत फडणवीस म्हणाले की, बारा बारा दिवस खासदारांना आणि आमदारांना जे जेलमध्ये ठेवताता त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा ठेवणं हे पूर्णपणे चुकीचे आहे. या सरकराच्या विरोधात आम्ही लढतो आहे. त्यांनीसुद्धा लढलं पाहिजे असा सल्ला राज ठाकरेंना फडणवीसांनी दिला आहे. त्यांच्या विरोधाचं काय कारण आहे. ते मला माहिती नाही. परंतु माझं एक अतिशय स्पष्ट मत आहे. रामाच्या चरणापाशी जो जात असेल त्याला जाऊ दिले पाहिजे. त्याला जाऊ दिले पाहिजे असे रोखले नाही पाहिजे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

शरद पवारांनी राज्याची चिंता करावी

देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावरसुद्धा निशाणा साधला आहे. मला असं वाटतं की शरद पवार यांनी महाराष्ट्रातील प्रश्नांवर लक्ष दिले तर बरं होईल. महाराष्ट्रातील शेतकरी, महिला यांचे प्रश्न ज्येष्ठ नेते म्हणून लक्ष देऊन त्यांच्या सरकारला जर निर्देश दिले तर अधिक बरं होईल. देशामध्ये मोदींचे सरकार उत्तम काम करत आहे. लोकं मोदींवर खूश आहेत. त्यांनी वारंवार विश्वास दाखवला आहे. त्यामुळे आता पवारांच्या बहुमूल्य सल्ल्याची गरज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आहे. त्यांना सल्ला द्यावा असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

यूपीने मुंबईत कार्यालय खोलल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही

मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. अनेक राज्यांची आर्थिक गुंतवणूक कार्यालये आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशने एखादं कार्यालय काढल्यामुळे लगेच घाबरण्याची गरज नाही. मुंबई ताकदवान आहे. महाराष्ट्रा ताकदवान आहे. महाराष्ट्र हे एक चुंबक आहे. एखादं ऑफिस निघालं काय आणि नाही निघालं काय? महाराष्ट्रावर परिणाम एकाच गोष्टीचा होईल. ज्या प्रमाणे महाराष्ट्रात सध्याच्या सरकारचा सुरु आहे. ज्या प्रकारे मंत्री जेलमधून कारभार करत आहेत. वर्क फ्रॉम जेल सुरु आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावर होईल.


हेही वाचा : आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र