घरताज्या घडामोडीसहकार मोडीत काढण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसनं केलं, देवेंद्र फडणवीसांचा घणाघाती आरोप

सहकार मोडीत काढण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसनं केलं, देवेंद्र फडणवीसांचा घणाघाती आरोप

Subscribe

सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचे कामच राष्ट्रवादी काँग्रेसनं केलं असल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्यातील प्रवरा येथे सहकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. परंतु राज्य सरकारमधील प्रमुख नेत्यांना या परिषदेचं निमंत्रण देण्यात आले नाही. तर सहकार क्षेत्राच्या प्रश्नांवरुन भाजपने आता राज्य सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीमध्ये साईबाबांचे दर्शन घेतल्यावर माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी फडणवीस म्हणाले की, देशात सहकारी मंत्रालय पहिल्यांदा तयार झाले आहे. १०० वर्षांपेक्षा जास्त जुनं सहकार क्षेत्र आहे. पण देशात वेगळं सहकार मंत्रालय नव्हते, पहिल्यांदा मोदींनी सहकार मंत्रालय केलं. यानंतर अमित शाह यांच्यासारख्या नेत्याला सहकार मंत्री केले. आज त्यानिमित्त महाराष्ट्र जी सहकाराची भूमी आहे. पहिला सहकारी साखर कारखाना या महाराष्ट्रात झाला. म्हणून इथे एक सहकार परिषद घेऊन सहकारातील अडचणी दूर करण्यासाठी आणि सहकाराला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करायचे यासाठी अमित शाह आलेत असे फडणवीस म्हणाले आहेत.

- Advertisement -

राज्यातील सहकार क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेसन मोडीत काढण्याचे काम केलं असल्याची घणाघाती टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देशाच्या पहिल्या सहकार परिषदेला राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रण दिलं नाही. परंतु राज्य सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष येणार आहेत. शिखर संस्थेच्या प्रमुखांना बोलवलं असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

राजकीय सूड उगवण्यासाठी सहकार क्षेत्राचा वापर

भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात १०० टक्के साखर कारखानादारीचे उदाहरण पाहिले तर १०० टक्के उद्योग साखर क्षेत्रात होता. आज सहकार क्षेत्राचा सहभाग ४५ टक्के राहिला आहे. कारखाने खाजगी का झाले? सहकारी कारखान्यांचे खाजगीकरण का करण्यात आले? कारखाने कवडीमोल भावाने विकण्याची वेळ का आली? म्हणजे फक्त राज्य सरकारने सहकार कारखान्याचा उपयोग आपल्या राजकीय स्पर्धकांना नामोहरण करण्यासाठी केला आहे. सहकार क्षेत्राच्या खाजगीकरणाला ज्यांनी प्रोत्साहन दिलं त्यांच्याबाबत आम्हाला आक्षेप असल्याचे राधाकृष्ण पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा :  अनिल परब शिवसेनेच्या मुळावर उठलेत, रामदास कदमांचा पत्रकार परिषदेत आरोप

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -