घरताज्या घडामोडीमहाराष्ट्रात जिल्हा कोऑपरेटीव्ह बॅंकांमध्ये हजारो कोटींचे घोटाळे, अमित शहांचे टीकास्त्र

महाराष्ट्रात जिल्हा कोऑपरेटीव्ह बॅंकांमध्ये हजारो कोटींचे घोटाळे, अमित शहांचे टीकास्त्र

Subscribe

राज्य सरकारने सल्ले देण्यापेक्षा सहकार क्षेत्रासाठी एकत्र काय करता येईल हे पहावे

जिल्हावार बॅंकाचा पाया हा महाराष्ट्रातून देशभरात रचला गेला. पण याच महाराष्ट्रात आता अवघ्या तीन बॅंका शिल्लक आहेत. जिल्हावार कोऑपरेटीव्ह बॅंका निर्माण करणाऱ्या महाराष्ट्रात हजारो कोटींचे घोटाळे कसे झाले ? हे घोटाळे आरबीआयने केले का ? असा सवाल देशाचे गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केला. प्रवरानगर येथे भरवण्यात आलेल्या सहकार परिषदेतून ते बोलत होते. मी याठिकाणी कोणतेही राजकारण करायला आलेलो नाही. आगामी काळात कोणावरही अन्याय होणार नाही. फक्त पारदर्शकता आणावी लागेल आणि क्षमतावाढ करावी लागेल. प्रोफेशनल्स लोकांना सहकारी आंदोलनाशी जोडावे लागेल, तरच सहकार आंदोलन आगामी ५० ते १०० वर्षे टिकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केले. त्यासाठी आपल्यातही परिवर्तन करावे लागेल.

विखे पाटलांनी ज्या दूरदर्शितेने साखर कारखाना टाकला, तो आजही सहकार पद्धतीने सुरू आहे, याचा आनंद. कारण अनेक सहकार कारखाने प्रायव्हेट झाले. अशा स्थितीत हा साखर कारखाना प्रेरणास्त्रोत आहे.

- Advertisement -

सहकार मंत्रालयाची स्थापना झाली तेव्हा अनेकांनी या मंत्रालयाचे संदर्भ, प्रासंगिकता काय आहे? असा सवाल केला. त्या सर्वांना मी आज उत्तर द्यायला आलो आहे. सहकार तत्वावर आजही दूध खरेदी, गहू, धान्य, खत निर्मिती आणि वितरण यासाऱखी कामे होत आहेत. लिज्जत पापड आणि अमूल यासारख्या सहकार उद्योगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दररोज लाखो रूपयांना महिलांना रोजगार मिळतो आहे.

महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांना एक नजरेने पहायला हवे. त्यासाठी राजकारण किंवा राजकीय चष्म्यातून याकडे पहायला नको.आम्ही सविस्तर अभ्यास केला आहे. त्यामुळे आमचा संपूर्ण प्रयत्न असेल की साखर कारखाने चालू राहतील आणि ते खाजगी करण्याची वेळ येणार नाही. त्यासाठी राजकारणी लोक संचालक असलेल्या साखर कारखान्यात राजकारण न करता सहकार क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची भूमिका असायला हवी. मी सहकारमध्ये तोडायला नव्हे जोडायला आलो आहे.

- Advertisement -

राज्य सरकारनेही सहकार क्षेत्रासाठी पुढे यायला हवे. त्यासाठीच राजकारण सोडून सरकारने पुढे यायला हवे. राज्य सरकारने मला सल्ले देण्याएवजी राज्यात काय सुरू आहे ते पाहण्याची गरज आहे. त्यासाठीच काय प्रयत्न करता येतील, त्यासाठी पुढे यायला हवे. यापेक्षाही चांगला विचार करायला हवा. तसेच राज्य सरकारनेही याच पद्धतीने पुढे चालायला हवे, असेही ते म्हणाले.

सहकार क्षेत्रातील सुधारासाठी आगामी काळात आता नवीन समिती बनणार नाही. सध्याच्या सहकार क्षेत्रातील चळवळीचे आधुनिकीकरण करावे ही अपेक्षा आहे. त्यासाठी संगणकीकरणाची जोड देतानाच प्रोफेशनल्सला सन्मान मिळायला हवा. सहकार चळवळीनेही स्पर्धेत उतरावे तेव्हाच चळवळ पुढे नेता येईल. सहकार चळवळीत नवीन प्राण फुंकण्याची गरज असून येत्या काळात सहकार क्षेत्रासाठी नवीन विद्यापिठाची स्थापना करत असल्याचेही ते म्हणाले. येत्या काळात सहकार क्षेत्रात नवीन धोरण आणणार असल्याचेही ते म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारने मिळून ही सहकार चळवळ पुढे नेण्याची गरज आहे. नक्कीच संकटातून बाहेर पडण्यासाठी ईश्वरही आपली मदत करेल असेही त्यांनी सांगितले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -