घरठाणेकल्याण लोकसभेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज - सुषमा सातपुते

कल्याण लोकसभेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज – सुषमा सातपुते

Subscribe

डोंबिवली । निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून 18 व्या लोकसभेसाठी 18 एप्रिल ते 1 जूनपर्यंत मतदान होणार आहेत. कल्याण लोकसभा मतदार संघात 20 मे रोजी मतदान होणार असून त्यासाठी संपूर्ण निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती कल्याण लोकसभा मतदार संघ निवडणूक निर्णय कार्यकारी अधिकारी सुषमा सातपुते यांनी डोंबिवलीत दिली. कल्याण लोकसभा मतदार संघात अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व ,कल्याण ग्रामीण , डोंबिवली आणि कळवा- मुंब्रा असे सहा विधानसभा मतदार संघ आहेत. या मतदार संघात 20,18,958 मतदार असून यामध्ये तृतीयपंथी 738, दीव्यांग 10,802, नवमतदार 22,179 आहेत. कल्याण लोकसभा क्षेत्रात 1955 मतदान केंद्र आहेत.निवडणूक शांततेत पार पाडण्या बरोबरच मतदानाचे टक्केवारी वाढावी यासाठी नागरिकांनी मतदानासाठी यावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सातपुते यांनी केले.

मागील लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघात अवघे 45 टक्के इतके कमी मतदान झाले होते. त्यामुळे यंदा किमान 75 टक्के मतदान होणे आयोगाला अपेक्षित आहे. टक्केवारी वाढावी यासाठी जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.85 वयोगटावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार यांच्यासाठी घरातून मतदान करता येणार आहे .त्यांच्यासाठी 12 ड फॉर्म भरून दिल्यानंतर आमचे निवडणूक कर्मचारी घरी जावून ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांचे मत नोंदवून घेण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे .सिविजील प द्वारे निवडणुकीच्या दरम्यान काही अनियमितता आढळल्यास या पद्वारे संदेश शेअर करू शकता,अशी माहिती सातपुते यांनी दिली.

- Advertisement -

नामनिर्देशित पत्र दाखल करणे, पत्रछाननी,नामनिर्देशन पत्र मागे घेणे चिन्हवाटप इ बाबतची कार्यवाही सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुल येथे करण्याची तरतूद करण्यात आली आहे. इव्हीएम मशीन साठी स्ट्रोन्ग रूम क्रीडा संकुलात तयार करण्यात येणार आहे. तसेच मतमोजणी देखील याच क्रीडा संकुलातील बंदिस्त प्रेक्षागृहात 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. प्रत्येक उमेदवाराला मतदार संघात 75 लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा घालून देण्यात आली आहे.6 भरारी पथक, निवडणूक पथक नेमण्यात आले आहेत. 23 एप्रिलपर्यंत 18 वर्षांवरील नागरिकांना मतदान यादीत आपले नाव नोंदणी करता येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सातपुते यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -