घरमहाराष्ट्रवाझे पूर्वीचे शिवसैनिक होते म्हणून वाचवलं जातंय का? फडणवीसांचा सवाल

वाझे पूर्वीचे शिवसैनिक होते म्हणून वाचवलं जातंय का? फडणवीसांचा सवाल

Subscribe

मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. पोलीसमधलेच लोकं अशाप्रकारे गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होत असतील तर कायदा आणि सुव्यवस्था राहिल कशी? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. मी हा विषय सातत्याने मांडत होतो. परंतु सरकार वाझेंना पाठीशी घालण्याचं काम सातत्यानं होत होतं. मला माहित नाही की वाझे पपूर्वी शिवसेनेत होते म्हणून वाचवलं जात आहे, असं देवेंद्र फडणवी म्हणाले. पण आता NIA ने केलेल्या कारवाईत अनेक पुरावे मिळाले आहेत आणि कशाप्रकारे गुन्हा घडला आहे, हे देखील समोर आलं आहे, असं फडणवीस म्हणाले. याशिवाय, दुसरा भाग म्हणजे मनसुख हिरेन यांची हत्या झाली आहे, त्याचे देखील पुरावे समोर येतील, असं फडणवीस म्हणाले.

सचिन वाझे उच्च न्यायालयाच्या आदोशानं निलंबित झाले होते. मात्र, महाविकास आघआडी सरकारने कोरोनाचं कारण देत वाझेंना पुन्हा रुजू करण्यात केलं. क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख हे पीआय असतात. परंतु त्यांना बाजूला करुन सचिन वाझे यांना प्रमुख केलं. एपीआय दर्जाचे अधिकारी क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख कसे होते? मुंबईतील प्रत्येक महत्वाची केस वाझेंकडेच का देण्यात आली? असं सवाल फडणवीस यांनी केले. या प्रकरणाचा तपास जे करत होते त्यांनाच अटक झाली हे गंभीर आहे असं फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

ज्यावेळी मी मुख्यमंत्री होतो आणि माझ्याकडे गृह खातं होतं, त्यावेळी वाझेंना रुजू करण्याचा आग्रह शिवसेनेच्या नेत्यांनी धरला होती. म्हणून त्यावेळी मी Adv. जनरल यांना बोलवून ती फाईल दाखवली होती आणि त्यावेळी मला असा सल्ला दिला गेला होता की, उच्च न्यायालयाच्या आदेशाने ते निलंबित झालेले असल्याने त्यांना घेणं योग्य होणार नाही, तो उच्च न्यायालयाचा अपमान होईल. मात्र हे सरकार आल्यानंतर त्यांनी कोरोनाचं कारण दाखवून कोरोनात आम्हाला निलंबित अधिकारी हवे आहेत, असं कारण सांगत त्यांना पुन्हा घेतलं. क्राईम इंटलिजन्स युनिट हे मुंबई पोलिसांचं सगळ्यात महत्वाचं युनिट आहे. या युनिटचा प्रमुख नेहमी एक पोलीस निरीक्षक दर्जाचा व्यक्ती असतो, यांना घेतल्यानंतर रातोरात पोलीस निरीक्षक दर्जाच्या व्यक्तीची बदली करण्यात आली आणि एपीआय दर्जाचे जे सचिन वाझे आहेत, यांना त्याचा पूर्ण चार्ज देण्यात आला. त्यानंतर मुंबईमधील कुठलीही केस असो ती प्रत्येक केस ही त्यांच्याकडे जाईल, अशाप्रकारचं त्या ठिकाणी काम सुरू झालं. म्हणून त्यांचं जे वाढतं महत्व होतं, सरकारचा जो वाढता पाठिंबा होता किंवा जो सरकारचा वाढता विश्वास त्यांच्यावरती होता. ते शिवसैनिक होते म्हणून होता की काय कारण होतं मला माहिती नाही, परंतु या विश्वासामुळे त्यांना असं लक्षात आलं की आपण काहीही करू शकतो आणि अशा या मानसिकतेमधून हे काम झालेलं आहे, असं मला वाटतं.

 

- Advertisement -

हेही वाचा – स्फोटकांची स्कॉर्पिओ: या प्रकरणात अंबानींची तक्रार कुठे आहे?; असीम सरोदेंचा सवाल


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -