घरटेक-वेकTRAI चे नियम मोडल्यास ३ दिवसांनंतर SMS बंद अन् कोणताही OTP येणार...

TRAI चे नियम मोडल्यास ३ दिवसांनंतर SMS बंद अन् कोणताही OTP येणार नाही

Subscribe

ज्या कंपन्यांनी या रेग्यूलेशन प्रक्रियेला अद्याप फॉलो केले नाही त्यासाठी त्या कंपन्यांना तीन दिवसांचा अवधी

बँक, लॉजिस्टिक आणि ई-कॉमर्स बिजनेस युनिट्सना आपल्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात कमर्शियल SMS पाठवण्यासाठी टेलिमार्केटिंग नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे, त्यासाठी तीन दिवसांच्या आत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याची माहिती टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडियाने अर्थात (TRAI) ने दिली आहे. जर ट्रायच्या नियमांचे पालन केले नाही किंवा ते नियम मोडल्यास कंपन्यावर त्यांच्या ग्राहकांना कमर्शियल SMS पाठवण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. या कंपन्यांनी ट्रायचे नियम न पाळल्यास, तीन दिवसांनंतर बँक, लॉजिस्टिक आणि ई-कॉमर्स कंपन्यांकडून येणारे कमर्शियल SMS बंद होतील. त्यामुळे ग्राहकांना बँक, शॉपिंग आणि इतर कामात अडथळा निर्माण होऊ शकतो, अशी माहिती लिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडियाने अर्थात (TRAI) ने दिली आहे.

ट्रायने दिला ३ दिवसांचा अवधी

ऑनलाईन होणाऱ्या फ्रॉडवर निर्बंध घालण्यासाठी नवं sms रेग्यूलेशन करण्यात आले असल्याचे ट्रायकडून सांगण्यात आले आहे. ज्या कंपन्यांनी या रेग्यूलेशन प्रक्रियेला अद्याप फॉलो केले नाही त्यासाठी त्या कंपन्यांना तीन दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत कंपन्यांना संपूर्ण रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पार पाडता येईल. ज्या कोणत्या कंपन्या ट्रायच्या नियमांचं पालन करणार नाही त्या कंपन्याचं नाव डिफॉल्टर कंपन्यांच्या यादीत मोडणार असून कंपनीच्या वेबसाईटवर पोस्ट करण्यात येईल.

- Advertisement -

दिल्ली हायकोर्टने टेलिकॉम रेग्युलेटर TRAI ला आदेश दिले होते की, फ्रॉड, SMS वर त्वरित रोख लावावी, ज्यामुळे सर्वसामान्य लोकांची यात फसवणूक होऊ नये. कोर्टाचा हा आदेश पूर्ण करण्यासाठी TRAI ने नवी DLT सिस्टम सुरू केली. नव्या DLT सिस्टममध्ये रजिस्टर्ड टेम्पलेटवाल्या प्रत्येक SMS च्या कॉन्टेंटला वेरिफाय केल्यानंतरच डिलिवर केले जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेला स्क्रबिंग असे म्हटले जाते.


वाझेंच्या अटकेनंतर NIA घेणार घराची झडती? कुटुंबीयही १०-१२ दिवसांपासून गायब

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -