घरमहाराष्ट्रDevendra Fadnavis : मोदी, शाह हे संताजी आणि धनाजी...फडणवीसांचा नवा दावा

Devendra Fadnavis : मोदी, शाह हे संताजी आणि धनाजी…फडणवीसांचा नवा दावा

Subscribe

 

कल्याणः पूर्वी संताजी आणि धनाजी होते. त्यांना सर्वजण घाबरायचे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे संताजी आणि धनाजी आहेत. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि कॉंग्रेस या दोघांना घाबरते, असा अजबच दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केला.

- Advertisement -

कल्याण येथे भाजपचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. कालचं उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकलं. त्यांच भाषण ऐकून ओकारी आली. आज शिवसेनेचे दोन वर्धापन दिन साजरे होते आहेत. त्यातील एक खऱ्या शिवसनेचा वर्धापन दिन आहे तर खोट्या शिवसेनेचा आहे. खरे गद्दार हे उद्धव ठाकरे आहेत. त्यांनी गद्दारी केली. त्यांना दुसऱ्यांना गद्दार म्हणणायचा काहीच अधिकार नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी हाणला.

हेही वाचाःUddhav Thackeray : फडणवीसांची हास्यजत्रा…मोदींनी कोरोना लस तयार केली; उद्धव ठाकरेंचा टोला

- Advertisement -

तुम्ही अडीच वर्षे सत्तेत होतात. ती अडीच वर्षे ही कुंभकर्णाची होती. उद्धव ठाकरे हे दोनदाच मंत्रालयात गेले. त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला, असं मी नाही म्हणत तर महाविकास आघाडीचे निर्माते शरद पवार म्हणतात. आम्ही जनतेची कामे करत आहोत. विविध योजना राबवत आहोत. तुम्ही एकही योजना राबवलेली नाही. तुम्ही दावा करत असलेले सर्व प्रकल्प आमचे आहेत. तुम्ही काहीच केले नाही, असा आरोप फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

तुमच्या काळात सर्व प्रकल्प ठप्प होते. केंद्र सरकारच्या कोणत्याही प्रकल्पांना साथ न देण्याचा फतवा तुम्ही काढला होता. आम्ही सर्व रखडलेले प्रकल्प मार्गी लावले. आरे कारशेडचा मुद्दा निकाली काढला, असेही फडणवीस यांनी सांगितले.

बडवा काय बडवायंच ते, आमच्या बापाचं काय जातंय

ठाकरे गटाची एकही मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेली नाही. तरीही उद्धव ठाकरे म्हणतात न्यायालयाचा निकाल सर्वांपर्यंत पोहोचवा. त्यामुळे बडवा काय बडवायंच ते, आमच्या बापाचं काय जातंय, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना गेल्या महिन्यात लगावला होता. खरी शिवसेना आमच्यासोबत आहे. शिल्लक सेना महाविकास आघाडीसोबत आहे. शरद पवार यांचं एक पुस्तक आलं आहे. त्यात शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत स्पष्ट लिहिले आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्यानंतर शिवसेनेत संघर्ष होईल याची कल्पना नव्हती. उद्धव ठाकरे हे मंत्रालयात जात नव्हते. ते सर्व माहिती ठेवत नव्हते. संघर्ष न करता त्यांनी पद सोडलं. ही परिस्थितीती टाळता आली असती, हे सर्व शरद पवार यांनी सांगितलं आहे. आम्हीही तेच म्हणत होतो. तेव्हा आमच्यावर महाराष्ट्र द्वेषी असा आरोप करण्यात आला. महाविकास आघाडीचे जनक शऱद पवार यांनीच उद्धव ठाकरेंवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. यासाठी शरद पवार यांचे मी आभार मानतो, अशी खोचक टीका फडणवीस यांनी केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -